रथ, घोडे-गाड्या, बँड, डीजे, दिंडी भजन आणि फटाक्याने दुमदूमले शहर
वरोरा : भारतीय सुदर्शन समाज युवा शाखा व भारतीय सुदर्शन समाज महासंघ यांनी संयुक्तरीत्या वरोरा शहरात महर्षी श्री सुदर्शन महाराज यांची जयंती निमित्याने सुदर्शन महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सुदर्शन भवन येथून, डोंगरावार चौक ते पदमावर चौक, नेहरू चौक मुख्य बाजार लाईन, आंबेडकर चौक, कुंभार वार्ड, सावरकर चौक, पाण्याची टाकी वरून परत सुदर्शन समाज भवनात समापन कऱण्यात आले.
. सर्वं प्रथम सकाळी सुदर्शन महाराज जयंती निमित्याने सुदर्शन समाज चे युवा कार्यकर्तानी हिन्दू शमशान भूमि विसावा येथे वृक्षारोपण केले व समाज भवनात महर्षी सुदर्शन महाराज यांच्या प्रतिमेची समजातील वरीष्ठ नागरिक व युवा व महिला मंडल यांनी पूजा आरती केली. रथावर सुदर्शन महाराज ची फोटो ठेवून मिरवणूक काढली, या मिरवणूक महिलांनी डोक्यावर कलश घेऊन रॅलीत सहभागी झाले, समजातील सहभागी मुले मुलीनी धार्मिक गाण्यांवर जोमाने नृत्य केले व शेवटी सर्वांना महाप्रसादचें आनंद घेतले.
. यावेळी भारतीय सुदर्शन समाज युवा शाखा वरोरा चे अध्यक्ष रवि बीरीया, किसन नकवे, अनिल नकवे, किसन नकवे, रवि बरसे, रोहन नकवे समजातील वरीष्ठ समाजसेवी विनोद बिरीया, ऍड रोशन नकवे, अमर समुंद्रे, भारतीय सुदर्शन समाज महासंघ चे प्रदेश संघटन मंत्री राजेश रेवते, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश उर्फ गणेश बिरिया, महिला तालुका अध्यक्ष आरती कैलास लंगोटे, माधुरी बिरिया, रेखा सातपुते, किर्ती बिरिया, सोनम पांडे, रितू शेंद्रे, ज्योती बिरियां, पूजा बिरियां, यांनी परिश्रम घेतले


