Home राजकीय कांग्रेस व भाजपा पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू

कांग्रेस व भाजपा पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू

1287

डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे प्रतिपादन

विसापूर येथे पार पडली प्रचार सभा

विसापूर : बल्लारपूर विधानसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असी आहे. दोन मातब्बर आघाडी विरुद्ध मतदारांची उमेदवार म्हणून मी निवडणुकीच्या रणांगणात आहे. सर्वच स्तरावर विधानसभा क्षेत्रात मला वाढता पाठिंबा मिळत आहे. कांग्रेस व भाजपा उमेदवार एकाच नाण्याच्या दोन बाजू असून मतदारांनी माझ्यावर विश्वास दर्शवून बल्लारपूर विधानसभेत प्रतिनिधी म्हणून संधी द्यावी, असे आवाहन बल्लारपूर विधानसभेच्या अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे ( बेहरे ) यांनी विसापूर येथील प्रचार सभेत गुरुवारी केले.

.      बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचावर विधानसभा निवडणूक प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. डॉ. अभिलाषा गावतुरे म्हणाल्या, मागील तीस वर्षापासून या भागाचे विधानसभेत प्रतिनिधी भाजपाचे आहे. याला कारणीभूत कांग्रेसचे प्रत्येक निवडणुकीतील उमेदवार आहेत. यावेळी देखील तेच कसे विजयी होतील. याची रणनिती कांग्रेसच्या पातळीवर केली जात आहे. भाजपाचे व कांग्रेसचे राजकारण एकमेकांना पुरक आहे, असा घणाघाती आरोप देखील डॉ. गावतुरे यांनी प्रचार सभेत केला.

.      बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात माझी उमेदवारी सर्वसामान्य जनतेच्या बळावर आहे. मी सुशिक्षित असून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. माझे सामाजिक कार्य सर्वश्रुत आहे. निवडणूक दरम्यान महिला मतदारांना प्रलोभन दाखविल्या जात आहे. लाडकी बहीण असे गोंडस नाव दिले. आजच्या महागाईच्या काळात ही महिलांची थट्टा आहे. मी निवडून आल्यावर महिलांना एक हजार पाचशे रूपये नाही, तर प्रत्येक महिलांना १५ हजार रुपये दर महिन्याला मिळावे, म्हणून प्रयत्न नक्की करणार आहे. भाजप व कांग्रेस पार्टी चे उमेदवार धनशक्तीचा वापर करणार आहे. तो तुम्ही जरूर घ्या. मात्र,जनशक्ती ची उमेदवार म्हणून मला विधानसभेत प्रतिनिधी निवडून द्या, असे डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी मतदारांना आर्जव केली.यावेळी मंचावर सामाजिक कार्यकर्ते बी.एम.कांबळे, डॉ. राकेश गावतुरे, डॉ. रायपुरे,डॉ. सूर,संजय फाले,सावतामाळी सावित्रीबाई फुले सेवा मंडळ अध्यक्ष गणेश मोहुर्ले,सामाजिक कार्यकर्ते राजू लांडगे यांची उपस्थिती होती. सभेचे संचालन प्रदीप लांडगे यांनी केले.यावेळी सभेला विसापूरकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

error: Content is protected !!