Home राजकीय चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस – भाजपाची थेट लढत 

चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस – भाजपाची थेट लढत

1315

आनंद मेश्राम

  नागभीड : विधानसभेचा प्रचार आणी प्रसार आता रंगात आला असून मुख्य लढत काँग्रेस आणी भाजपा यांच्यातच आहे.पण या क्षेत्रात काँग्रेस वरढड दिसत आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा सतीश वारजूकर यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांना उमेदवारी दिली आहे. आता चिमूर विधानसभा क्षेत्रात रंगत वाढली असून काँग्रेस आणि भाजपाची थेट लढत होणार आहे.

.        प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार निवडून यावा असे वाटत असते. आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे दहा वर्षांपासून या क्षेत्राचे नेतृत्व करीत आहेत. पण या क्षेत्राचा विकास झाला नसल्याचे मतदारात बोलल्या जात आहे. आजही या क्षेत्रात अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा नाहीत. गोसेखुर्द धरणाचे पाणी अजून प्रयन्त मिळाले नाही. या क्षेत्रात बेरोजगारांची फौंज तयार झाली आहे. अनेक तरुण रोजगारासाठी भटकत आहेत. या क्षेत्रात एकही उद्योग नाही. रस्ते होणे म्हणजे विकास नाही. अनेक रस्ते निकृष्ट आहेत. विकासाच्या नावाखाली बेधुंद कारभार सुरु आहे. पिण्याच्या पाण्याच्या सुविधा नाहीत. येथील शेतकरी एका पिकावर अवलंबून आहे. अशा अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहे. नुसते मेळावे घेतल्याने विकास होत नाही. सतीश वारजूकर हे जी. प. चे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांच्या जनसंपर्क दांडगा आहे. जनतेत मिसळणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. तसेही सतीश वारजूकर हे शंकरपूर येथील रहिवासी आहेत. आणी ते डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांची नाळ ग्रामीण भागाशी जुडलेली आहे. 25 ते 30 वर्षांपासून त्यांचा परिवार काँग्रसशी जुडलेले आहेत. त्यांचे भाऊ हे सुध्दा आमदार राहिलेलं आहेत. तसाही हा क्षेत्र काँग्रेससाठी अनुकूल राहिलेले आहे. पुन्हा या क्षेत्रात परिवर्तनची लाट बघायला मिळत आहे. दहा वर्षांपासून या क्षेत्राचे नेतृत्व कीर्तिकुमार भांगडिया करीत आहेत. या क्षेत्रात अनेक समस्या असल्या तरी कोणताही आमदार पूर्ण करू शकत नाही. सिंचन सुविधा, बेकारी, रोजगार, जबराणजोत समस्या, महागाई अशा समस्या आवासून उभ्या आहेत.

.        आता प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कसरत करत आहेत. आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या पुढे सतीश वारजूकर यांचे तगडे आव्हान आहे. या क्षेत्रात प्रधानमंत्री मोदी यांची सभा झाली. परंतु यावेळी मोदी लाट दिसत नाही. गावागावात एकच चर्चा आहे ती परिवर्तनाची. खरोखरच या क्षेत्रात परिवर्तन होणार काय? या कडे जनतेचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!