Home चंद्रपुर जिल्हा विशेष मंडप व्यावसायिकांना आले सुगीचे दिवस

मंडप व्यावसायिकांना आले सुगीचे दिवस

1314

विधानसभा निवडणुकीचे वारे

दररोज हजारो रुपयांची उलाढाल

वरोरा : तालुक्यासह संपुर्ण राज्यात निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. प्रचाराच्या सभा घेण्यासाठी मंडप, साऊंड, लाईट, स्टेज व्यवस्था पुरवणाऱ्याकडे प्रचारसभांची कामे दिली जातात. त्यामुळे सध्या मंडप व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.

.     निवडणुकीच्या दिवसांत स्टार प्रचारक नेत्यांच्या अनेक प्रचार सभा होत आहेत. त्यासाठी मंडप स्टेज तयार करणारे, स्टेज फुलांनी सजवणारे, कारपेट, माइक-साऊंड सिस्टिम, एलईडी, पंखे, कुलर, सोपासेट, खुर्चा यासारख्या उपकरण सामुग्रीला मोठी मागणी होत आहे. यामुळे मंडप व्यावसायिकांची दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. निवडणूक कालावधी कमी असल्याने ठिकठिकाणी प्रचाराने जोर धरला आहे. निवडणुकीची चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीमुळे आर्थिक चक्रही गतिमान झाले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि इतर कामकाजासाठी मनुष्यबळ वाढले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

.      डिजिटल प्रिंटिंग व्यावसायिक, स्पीकर, मंडप, फेटेबाले, हॉटेल व्यावसायिक, रिक्षा व्यावसायिक, फुले व्यावसायिक यांनादेखील सुगीचे दिवस आले आहेत. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीमुळे संपूर्ण जिल्हाभर कॉर्नर सभा, प्रचार सभा होत आहेत. त्यामुळे मंडप, लाईट यासह अन्य साहित्यांना मागणी वाढली आहे. एकंदरीत दसऱ्यानंतर निवडणुकीच्या काळात मंडप व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.

error: Content is protected !!