Home चंद्रपुर जिल्हा विशेष गोठ्यात बांधलेल्या गायीवर वाघाचा हल्ला

गोठ्यात बांधलेल्या गायीवर वाघाचा हल्ला

1318

गावकर्‍यांत दहशत

चिमूर तालुक्यातील सरडपार येथील घटना

नेरी : शेतकर्‍यांच्या जनावरांच्या गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांवर वाघाने हल्ला केला. यात गोठ्यात बांधून असलेल्या गायीला ठार करीत शेताकडे फरफडत नेल्याची घटना शुक्रवारी 8 नोव्हेंबर ला पहाटेच्या सुमारास चिमुर तालुक्यातील सरडपार येथे घडली.

.      चिमुर तालुक्यातील सरडपार येथे श्रावण गुळधे यांच्या मालकीचे शेत आहे. शेतापासून व गावाजवळ काही अंतरावर गुळधे यांचा गोठा आहे. या गोठ्यात गूळधे यांनी नेहमी प्रमाणे जनावरे बांधली होती. दि ० ८  नोव्हेंबर रोजी पहाटे ३  वाजताचे  सुमारास गुरांचे गोठ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवून गोठ्यात बांधलेल्या गायीला ठार करून बाजूलाच लागून असलेल्या कापसाचे शेतात दोनशे मिटर अंतरावर ओढत नेले. दरम्यान सकाळी पहाटे  ५  चे सुमारास शेतकरी श्रावण गुळधे  हे दैनंदिनी प्रमाणे गुरांचे गोठ्याकडे गेले असताना गोठ्यात एक गाय दिसली नाही त्यामुळे त्यांनी जवळपास शोध घेतला असता गाय कापसाचे शेतात मृत अवस्थेत दिसली. तिच्या जखमावरून गायीवर वाघाने हल्ला करून ठार केल्याचे स्पष्ट झाले. याची माहिती गावात होताच एकच खळबळ माजली.

.      गावकर्‍यांनी तात्काळ वनविभागाला माहिती देऊन पाचारण करण्यात आले. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी गायीचा पंचनामा करून घटना स्थळावर सीसीटीव्ही  कॅमेरे लावण्यात आले. वाघाच्या हल्यात ठार झालेल्या गायीमुळे श्रावण गुळधे  यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना शासनाने तात्काळ मदत द्यावी. व वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी गावकर्‍यांकडून केली जात आहे.

error: Content is protected !!