Home चंद्रपुर जिल्हा विशेष राजकीय घडामोडीना दिशा देण्यारे गडचांदूर शहर उपेक्षितच ?

राजकीय घडामोडीना दिशा देण्यारे गडचांदूर शहर उपेक्षितच ?

1318

मारोती चाफले

 गडचांदूर : राजुरा विधानसभा क्षेत्रात मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या गडचांदूर शहरातूनच राजुरा –कोरपना – जिवती या तिन्ही तालुक्याच्या राजकीय घडामोडीना दिशा देण्याचे काम गडचांदूर शहरातूनच चालते मात्र कित्तेक निवडणुका होऊनही गडचांदूर शहराच्या विकासाला पानेच पुसली गेली त्यामुळे गडचांदूर शहर अजूनही उपेक्षित राहिले !

.      नावाला गडचांदूर शहर संबोधन लाभले असले तरी, शहराचा विकास गावाखेड्या पेक्षा कमीच आहे. तिन्ही तालुक्याचे माध्यवर्ती ठिकाण असतानाही शहराचा दर्जा मिळविण्यासाठी गडचांदूर शहराला दहा वर्षाचा संघर्ष करावा लागला, शहर तर झाले मात्र सोयसुविधांचा अभाव तसाच आहे. गडचांदूर शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा, शहरात सोयीसुविधा युक्त उपजिल्हा रुग्णालय निर्माण व्हावे, नागरिकांच्या आरोग्याचा समस्या सुठाव्यात, ही येथील नागरिकांची भाबडी अपेक्षा मात्र येथील लोकप्रतिनिधीनी तोंडाला पानेच पुसली,

.      राजुरा विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व मागील 25 वर्षांपासून कोरपना तालुका करतोय, गडचांदूर पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बीबी गावचे सुपुत्र ऍड. वामनराव चटप यांनी मागील 15 वर्ष राजुरा विधानसभेचे नेतृत्व केले, मात्र त्यांचा राबता असणारे गडचांदूर शहर मात्र त्यांनी उपेक्षित ठेवले. 15  वर्षाच्या कार्यकाळात शहराचा दर्जा तर दूर शहरासाठी साधे बसस्थानकही ते आणू शकले नाहीत. औद्योगीकरणाने येथील नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्या असताना तुटपुंजा आरोग्य कर्मचाऱ्याच्या भरोशावर ग्रामीण रुग्णालयाचा डोलारा उभा आहे.

.      मागील 15 वर्षाच्या काळात, दहा वर्ष गडचांदूर जवळील खिर्डी गावचे आ. सुभाष धोटे राजुरा विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करीत आहे, त्याचाही राबता सदैव गडचांदूर शहरातच असतो. पण गडचांदूर शहराच्या विकासाला न्याय देऊ शकले नाही. त्यांच्या मागील कार्यकाळात शहराचा दर्जा तर मिळवून दिला मात्र, शहरासारखा विकास ते घळवू शकले नाहीत. शहराला तालुक्याची गरज असताना 20 वर्षांपासून गडचांदूर तालुका होऊ शकला नाही, प्रवासाच्या सोयीसाठी साधे बसस्थानकही नाही. अशा एक ना अनेक समस्या या गडचांदूर शहराच्या आहेत. मात्र राजकीय नेतृत्वाने गडचांदूर शहराला दुय्यम स्थान दिल्याने शहराचा विकास होऊच शकला नाही.

error: Content is protected !!