सिंदेवाही : ग्राम पंचायत रामाळा येथील युवा सरपंच तथा वाल्मिकी मत्स सहकारी संस्थांचे माजी अध्यक्ष अरविंद मेश्राम यांनी बुधवारी माजी आमदार अतुल देशकर, भाजपा चे उमेदवार कृष्णा सहारे यांचे उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला असून ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रवेश केला असल्याने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला त्यांच्या प्रवेशाचा नक्कीच फायदा होणार आहे.
. सिंदेवाही तालुक्यातील रामाळा ग्राम पंचायत चे सरपंच अरविंद मेश्राम हे ओबीसी प्रवर्गातील असून वाल्मिकी मत्स सहकारी संस्थेच्या माध्यमातून त्यांचा बराच जनसंपर्क आहे. तालुक्यातील अनेक गावात वाल्मिकी जयंती उत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रात चांगले योगदान असल्याने गावागावांतील समाजात सुद्धा त्यांची बऱ्याच पैकी ओळख आहे. भारतीय जनता पक्षाचे धेय्य धोरण , आणि माजी आमदार अतुल देशकर यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत सध्याचे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे भाजपा चे उमेदवार कृष्णा सहारे यांचे विजयासाठी सरपंच अरविंद मेश्राम यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बुधवारी तल्लेवार सभागृह सिंदेवाही येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा स्नेहामिलन कार्यक्रम पार पडला त्यावेळी माजी आमदार अतुल देशकर यांचे प्रमुख उपस्थितीत उमेदवार कृष्णाभाऊ सहारे यांनी सरपंच अरविंद मेश्राम यांचे गळ्यात पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीराम डोंगरवार, सिंदेवाही नगर पंचायत चे नगरसेवक हीतेश सूचक, वासेरा येथील ग्राम पंचायतचे सरपंच दिलीप मेश्राम, भाजपा कार्यकर्ते राजू नंदनवार, इत्यादी मंचावर उपस्थित होते.


