Home सामाजिक निवृत्तीवेतन धारकांनी 30 नोव्हेंबरपूर्वी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

निवृत्तीवेतन धारकांनी 30 नोव्हेंबरपूर्वी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

1318

चंद्रपूर :  निवृत्ती वेतनधारकांची दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी हयात असल्याच्या प्रमाणपत्राची (Life Certificate) यादी संबंधीत बँकेसह पाठविण्यात येणार असून त्यावर आपल्या नावासमोरील रकान्यात निवृत्ती वेतनधारकांनी 30 नोव्हेंबर 2024 पुर्वी स्वत: उपस्थित राहून सदर यादीवर मोबाईल क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक नमुद करून स्वाक्षरी करावयाची आहे. जेणेकरून हयात असल्याचे प्रमाणपत्राची यादी कोषागाराला वेळीच प्राप्त होईल व त्यांचे माहे डिसेंबर 2024 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे वेळीच पाठविता येईल.

.        तसेच जे निवृत्तीवेतनधारक मनिऑर्डरद्वारे निवृत्ती वेतन घेतात, त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत कोषागाराला पाठवावे. खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आपण हयातीचा दाखला सादर करु शकता.

.        हयात प्रमाणपत्र 5 डिसेंबर 2024  पर्यंत कोषागारास  प्राप्त न झाल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2024 पासूनचे निवृत्तीवेतन बॅकेकडे पाठविले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!