Home राजकीय बंडखोरांना शर्यतीतून बाहेर पडण्यासाठी वेळ संपली

बंडखोरांना शर्यतीतून बाहेर पडण्यासाठी वेळ संपली

1318

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस उजळला

वरोरा विधानसभा निवडणूक आढावा

रवी खाडे

चंद्रपूर : आज 4 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस उजळला. राजकीय पक्ष बंडखोरांना शांत करण्यासाठी आणि त्यांना निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडण्यासाठी राजी करण्याची वेळ संपली. आज किती जण उमेदवारी मागे घेतील याकडे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतली नाही तर राजकीय पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. आज कोण उमेदवारी अर्ज मागे घेतो याकडे मतदारांचे ही लक्ष लागले आहे.

.    चंद्रपूर जिल्हातील सहा विधानसभा मध्ये वरोरा विधानसभा क्षेत्राकडे अनेकांचे लक्ष लागले आहे, जिथे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महाविकास आघाडी कडून काँग्रेस ची जागा आपले बंधू प्रवीण काकडे यांच्यासाठी खेचून आणली या जागेसाठी अनेकांनी दावेदारी केली होती तर शिवसेना (उबाठा) गटाचे मुकेश जिवतोडे यांनी सुद्धा उमेदवारी साठी अट्टाहास पकडला. शेवटी जागा काँग्रेस ला सुटल्याने जिवतोडे नी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे काँग्रेस ची उमेदवारी मिळावी म्हणून डॉ चेतन खुंटेमाटे यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांच्या कडून जिकरीने प्रयत्न केला मात्र असफल ठरले. त्यांनी सुद्धा मतदार संघ पिंजून काढत अखेर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर स्वर्गीय बाळू धानोरकर यांचे मोठे बंधू अनिल धानोरकर यांनी काँग्रेस, शिवसेना शिंदे गटा ची उमेदवारी मिळण्यासाठी मुंबई, दिल्ली वारी केली मात्र हाती काहीच लागले नसल्याने अखेर वंचित बहुजन आघाडी ची जागा मिळवली. ते भद्रावती शहराचे माजी नगराध्यक्ष आहे. भद्रावती तुन एकमेव उमेदवार असल्याने भद्रावती शहरात त्यांची जमेची बाजू असल्याचे बोलल्या जात आहे.

.    महायुतीची जागा शिवसेनेच्या वाट्याला येणार म्हणून अनिल धानोरकरांनी प्रयत्न केला होता तर जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी जोर धरला होता मात्र त्यांचा जोर अर्थातच थांबला आणि एकदम अलगद पणे करण देवतळे यांना भाजपाने उमेदवारी घोषित केली त्यामुळे इच्छुकांच्या आनंदात विरजण पडले.

.    उमेदवारी साठी नागपुरात ठिय्या करणारे रमेश राजूरकर, नरेंद्र जिवतोडे यांना भाजपने नाकारल्याने रमेश राजूरकर आणि नरेंद्र जिवतोडे यांनी बंडखोरी करीत नामांकन अर्ज दाखल केला. मात्र जिवतोडे आणि राजूरकर अर्ज मागे घेतील की भाजपा शी बंडखोरी करतील हे आज कळणारच आहे. स्वर्गीय संजय देवतळे यांचा हात पकडून कमळ फुलविणारे अहेतशाम अली यांनी प्रहार कडून उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या उमेदवारीने करण देवतळे यांना फार मोठा फटका बसणार आहे.

.         तर भाजपाचे काही कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या पाठीशी जुळले आहे. तर डॉ. खुंटेमाटे यांना काँग्रेस च्या काही नेत्यांनी विधानसभा साठी तयार केले मात्र उमेदवारी मिळाली नाही परंतु लढण्यासाठी दुजोरा देणारे काँग्रेस चे समर्थक त्यांना पाठिंबा देणार असल्याची छुपी खेळी सुरु आहे. त्यामुळे काँग्रेस चे प्रवीण काकडे यांना मोठी सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

.      अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबर आहे. ही मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार खऱ्या अर्थाने 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा प्रचार 18 नोव्हेंबरला संपणार आहे. परिणामी प्रचारासाठी अवघे 14 दिवस मिळणार आहे.

error: Content is protected !!