Home चंद्रपुर जिल्हा विशेष सोनं लंपास करणाऱ्या दोन महिलांना अटक

सोनं लंपास करणाऱ्या दोन महिलांना अटक

1301

शहर पोलिसांची कारवाई

5 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर : शहरातील विप्लव ज्वेलर्स मधून सोन्याचे दागिने घेऊन ऑटो ने घरी जात असताना ऑटो मधील दोन अज्ञात महिलांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी घडली. चंद्रपूर पोलिसांनी सिसिटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून दोन्ही महिलांना ताब्यात घेत रोख रक्कमे सह 5 लाख 33 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

.      पोलीस सूत्रानुसार शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या निता श्रीकृष्ण आवारी यांनी आई व मोठ्या बहिणीसोबत 28 हजार 875 रुपयांचे सोन्याचे टॉप्स खरेदी केले, मात्र त्यांनी घेतलेल्या सोन्यावर कुणाची तरी नजर होती याबाबत आवारी ह्या नकळत होत्या.

.        सोन्याचे टॉप्स घेतल्यावर आई व बहिणीसोबत ऑटोने घरी निघाल्या मात्र त्याक्षणी 2 अज्ञात महिला सुद्धा त्या ऑटो मध्ये बसल्या व पाण्याची टॉकी जवळ नागपूर रोड येथे उतरले, त्यानंतर निता आवारी यांनी बॅग मध्ये ठेवलेले सोन्याचे
टॉप्स तपासून बघितले असता त्यामध्ये ते आढळून आले नाही, 3 नोव्हेंबर रोजी निता आवारी यांनी घडलेला सदर प्रकार चंद्रपूर शहर पोलिसांसमोर कथन केला. नीता यांनी त्या 2 महिलांवर संशय व्यक्त केला.

.      पोलिसांनी कलम 303 अंतर्गत गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून बघितले व मुखबिर ने याबाबत पुढील माहिती पोलिसांना दिली, माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सुशीला प्रकाश शेट्टी (55) व वासंती उर्फ सोनू व्यंकटेश शेट्टी (28) राहणार एलबी नगर बँक कॉलोनी हैद्राबाद यांना अटक केली.

.    दोन्ही महिला आरोपीची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळून सोनं व चांदीचे दागिने रोख 1 लाख 33 हजार रुपये आढळून आले, पोलिसांनी एकूण 5 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात व्यंकटेश शेट्टी हा आरोपी पसार असून पोलीस त्याच्या शोधात आहे.

error: Content is protected !!