बोथली येथील घटना
गावकरी भयभीत
नेरी : चिमुर तालुक्यातील बोथली येथे दि 27 च्या पहाटेच्या सुमारास बिबट्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गावात घुसून घरासमोर शेड मध्ये बांधलेल्या शेळीवर ताव मारला. बिबट्याची गावात एन्ट्री झाल्याने गावकरी भयभीत झाले आहे.
बोथली येथील गणेश नागपुरे यांच्या मालकीची शेळी नेहमी प्रमाणे घरासमोरील शेड मध्ये बांधली होती पहाटेच्या सुमारास शेतशिवरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अंधाराचा फायदा घेत सरळ गावात प्रवेश केला आणि मध्य भागातील गणेश नागपुरे यांच्या घरासमोर बांधलेल्या बकरी वर हल्ला करून तिला जागेवरच ठार केले सदर बकरीला दोन पिल्ले होते त्यामुळे शेतकरी नागपुरे यांचे मोठे नुकसान झाले तेव्हा वनविभागाने नुकसानभरपाई द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
. सदर घटनेची माहिती पहाटे उजेडात आली शेळी मालकाने वनरक्षक पाटील काजळसर यांना मोबाईल द्वारे माहिती दिली असता वनरक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मृत बकरीला पंचनामा करून अहवाल वरिष्ठां कडे सादर केला आहे. नुकसान धारक पशु पालकाला तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.


