Home निधन वार्ता वेकोलि कर्मचाऱ्याने घेतला गळफास

वेकोलि कर्मचाऱ्याने घेतला गळफास

1315

नांदगाव (पोडे) येथील घटना

व्यसनाधीनतेला कंटाळून संपवली जीवनयात्रा

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथे नांदगाव इंन्क्वालाईन भूमिगत कोळसा खाण आहे. या खाणीत कार्यरत कर्मचाऱ्याने व्यसनाधीनतेला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार (दि.२७) ला सकाळी नांदगाव (पोडे) बस स्थानक जवळ उघडकीस आली. आत्महत्या करणाऱ्या वेकोलि कर्मचाऱ्याचे निलमसिंग पन्नालालसिंग ठाकूर (५0) रा.वेकोलि वसाहत नांदगाव (पोडे) असे नाव आहे.

.        निलमसिंग ठाकूर हा नांदगाव इंन्क्वालाईन भूमिगत कोळसा खाणीत कार्यरत होता. तो वेकोलिच्या वसाहतीत पत्नी व तीन मुली सोबत राहत होता. व्यसनाधीनतेमुळे तो कर्तव्यावर नियमित जात नव्हता.यामुळे कुटुंबात कलह वाढले होते. गृह कलह वाढल्याने त्याला नैराश्याने घेरले. व्यसन देखील वाढले होते. परिणामी त्याच्या कामावर विपरीत परिणाम झाला. तो कर्तव्यावर अनियमित जात होता. यामुळे घरात आर्थिक अडचण निर्माण होत होती.यातून सुटका करण्यासाठी त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली.

.        ही घटना रविवार ला सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या लक्षात आली. या घटनेची माहिती नांदगाव (पोडे) येथील उपसरपंच मल्लेश कोडारी, सूर्या अडबाले व सामाजिक कार्यकर्ते देवानंद शेंडे यांनी चंद्रपूर शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यावेळी मृतक निलमसिंग ठाकूर याच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यात व्यसनाधीनतेमुळे नैराश्य आल्याने जीवन संपवित असल्याचे नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचा निरीक्षक प्रभावती एकुर्के यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे व पोलीस कर्मचारी करीत आहेत.

error: Content is protected !!