सिंदेवाही : मागील दीड महिन्यापूर्वी कोतवाल नंदकिशोर खोब्रागडे यांची नदीत ढकलून हत्या करण्यात आली. त्या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार नामदेव धनविजय यांचे सह एकूण चार आरोपी सहभागी होते. मात्र तीन आरोपी यांना पोलिसांनी अटक केली. आणि १ आरोपी फरार झाला होता. त्या फरार आरोपीला नुकतेच सिंदेवाही पोलिसांनी अटक केली असून कुणाल विलास परचाके वय २३ वर्षे असे आरोपीचे नाव आहे. तो मुरादपुर तालुका समुद्रपुर जिल्हा वर्धा येथील रहिवाशी असून सिंदेवाही पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले आहे.
. बहुचर्चित विरव्हा येथील नंदकिशोर खोब्रागडे ( कोतवाल) यांची शेतीच्या वादातून १२ सप्टेंबर २०२४ रोजी नदीत ढकलून हत्या करण्यात आली. हत्येतील मुख्य सूत्रधार नामदेव धनविजय सिंदेवाही यांचेसोबत नंदू खोब्रागडे यांचा शेतीचा वाद सुरू होता. त्यामुळे नामदेव धनविजय यांनी आपल्या नातेवाईकांच्या सोबतीने नंदूचा काटा काढण्याचे ठरविले होते. त्यामध्ये त्यांनी समुद्रपुर जिल्हा वर्धा येथील तीन नातेवाईकांना हाताशी घेतले. या तिघांनी नंदू खोब्रागडे यांना फुस लावून घराबाहेर नेले. आणि मनसोक्त दारू पाजून त्याला दारूच्या नशेत नदीत ढकलून दिले. तब्बल ११ दिवसांनी पोलिसांना नंदू यांचे मृतदेह मिळाले. हत्येतील मुख्य सूत्रधार नामदेव धनविजय यांचेसह अन्य दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर एक आरोपी हा मागील दीड महिन्यापासून फरार झाला होता. घटनेच्या दिवसापासून सिंदेवाही पोलीस फरार आरोपीच्या शोधात होते. अखेर फरार आरोपी कुणाल विलास परचाके याला सिंदेवाही पोलिसांनी अटक केली असून अपराध क्रमांक ३४८/२०२४ कलम १४० (३) १०३ ,६१ (२) भारतीय न्यायसंहिता अंतर्गत त्याला न्यायालयात हजर करून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.


