Home चंद्रपुर जिल्हा विशेष हनुमान मुर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीला अटक

हनुमान मुर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीला अटक

1311

बल्लारपूर पोलिसांची यशस्वी कामगिरी

चंद्रपूर येथील आरोपीने केली मुर्तीची विटंबना

बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस ठाण्यांतर्गत चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर असलेल्या एका मंदिरातील हनुमान मुर्तीची विटंबना केल्याची घटना १९ आक्टोंबर रोजी घडली. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून चंद्रपूर येथील आरोपीला शुक्रवारी अटक केली आहे.

.        बल्लारपूर – चंद्रपूर राज्य महामार्गावर भिवकुंड परिसरात हनुमान मंदिर आहे. या मंदिरातील हनुमान मुर्तीची आरोपीने रागाच्या भरात मुर्तीची विटंबना करून तोडफोड केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती धक्का देणारी आहे. चंद्रपूर येथे राहणारा आरोपी व त्याच्या पत्नीत वाद झाला होता. त्यामुळे त्याची पत्नी बल्लारपूर येथे नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेली होती.

.        पत्नी नातेवाईकांकडे रागाच्या भरात निघून गेली. या प्रकाराचा त्याला पश्चाताप झाला. शनिवार (दि. १८) रोजी रात्री आरोपी दुचाकी वाहनाने बल्लारपूर ला जाण्यास निघाला. मात्र, सैनिक शाळेच्या वळणावर त्याच्या दुचाकीत बिघाड झाला. यामुळे तो संतप्त झाला. त्याने दुचाकी हनुमान मंदिराजवळ ठेवली. चंद्रपूर कडे जाण्यासाठी आरोपीने प्रयत्न केला. मात्र रात्रीची वेळ असल्याने एकही वाहन थांबत नव्हते. या रागाच्या भरात त्याने मंदिरातील हनुमान मुर्तीची विटंबना केली. मुर्ती तोडफोड करून पायदळ चंद्रपूर येथील घरी गेला.

.        चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर असलेल्या मंदिरातील हनुमान मुर्तीच्या विटंबना झाल्याने बल्लारपूर येथील विश्व हिंदू परिषदेच्या व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला होता. रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीला तातडीने अटक करावी म्हणून बल्लारपूर शहर बंदची हाक देऊन बंद केले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने योग्य दिशेने तपास करून हनुमान मुर्ती ची विटंबना करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या आरोपीला जेरबंद केले आहे. या घटने प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता -२0२४ च्या कायद्यान्वये कलम २९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे, सहायक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले, गजानन डोईफोडे, आनंद परचाके, सुनील कामटकर, पुरूषोत्तम चिकाटे, रणविजय ठाकूर, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, अनिता नायडू, मिलींद आत्राम यांच्या पथकाने केली.

error: Content is protected !!