सिंदेवाही : हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि शिवसेना पक्ष वाढीसाठी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या ब्रम्हपुरी विधानसभा प्रमुख पदी नेताजी गाहणे यांची निवड झाली असल्याने त्यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.
. सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुर येथील नेताजी गाहने हे मागील अनेक वर्षापासून शिवसेना पक्षात काम करीत असून त्यांच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेशाने विदर्भ संघटक किरण पांडव यांचे मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांचे सूचनेवरून चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख किशोर मुन्नाजी राय यांनी नेताजी गाहाने यांची शिवसेना ब्रम्हपुरी विधानसभा प्रमुख पदी निवड केली असून त्यांचे निवडीबाबत सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.


