Home सामाजिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चिमूर नगराचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव संपन्न

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चिमूर नगराचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव संपन्न

1288

नेरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चिमूर नगराचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव २० ऑक्टोंबर रोज रविवारला बालाजी देवस्थान चिमुरच्या पटांगणात पार पडला. व्यासपीठावर प्रमुख अतिथी दिनेश कठाणे प्रतिष्ठित व्यापारी, वक्ते सुनील मेंढे, तालुका कार्यवाह पराग बोरकर, नगर कार्यवाह समीर माकोडे उपस्थित होते.

.      यावेळी स्वयंसेवकांनी शारीरिक प्रात्यक्षिक, दंड, नियुद्ध, समता, योगासने, सांघिक व्यायाम योग, सांघिक गीत, सादर केले. संघ शताब्दी कडे वाटचाल करीत असताना स्वयंसेवकांनी पंचसुत्रीचा वापर स्वतःपासून केला पाहिजे. पर्यावरण, गोसेवा, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वदेशी जागरण,नागरी शिष्टाचार या सुत्राचा वापर समाजात जाऊन केले पाहिजे असे मत विदर्भ प्रांत सह सेवा प्रमुख प्रा.सुनीलजी मेंढे यांनी व्यक्त केले. प्रमुख अतिथी दिनेश कठाणे यांनी आपले विचार व्यक्त करताना १९४२ च्या क्रांती मध्ये संघ स्वयंसेवकांचा व चिमुर तालुक्यातील लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. संघ देश प्रेमाचे धडे देतो, संस्कार करतो चिमुर नगरातील मुलांनी सुद्धा संघांच्या शाखेत जावे असे उद्बोधनात म्हणाले.

.      कार्यक्रमात सुभाषीत, अमृतवचन, वैयक्तिक गीत झाले. प्रास्ताविक व पाहुण्यांचे परीचय नगर कार्यवाह समीर माकोडे यांनी केले. उद्बोधन ऐकण्यासाठी नगरातील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते. उत्सवापुर्वी नगरातील प्रमुख मार्गानी स्वंयसेवकाचे पथसंचलन निघाले. ठिकठिकीणी उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले.

error: Content is protected !!