वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा
शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वरोरा : खरीप हंगामातील संपूर्ण शेतमाल हमीभावाने खरेदी करावा. हमीभाव पेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या आणि नगदी पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक टक्का वसुल करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी. या मागणी सह इतर मागण्या संदर्भात उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला.
. मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणा मुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील वर्षी येलो मोझ्याक रोगाने सोयाबीन पीक नष्ट झाले. तर अति पावसाने कपाशीचे ही नुकसान झाले. पीक विमा कंपनीने सोयाबीन चा पीक विमा दिला मात्र कपाशीचा दिला नाही तो तात्काळ देण्यात यावा. यावर्षी परतीच्या पावसामुळे हातात आलेले सोयाबीन च्या पुंज्याला अंकुर फुटले , तर कापूस आणि धान या पिकाचे ही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकाचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी. ओरिमंटल पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार करून पाहणी केल्या जात नाही त्यामुळे कंपनीवर कारवाई करावी विविध संकटाचा सामना करत उरलेला शेतमाल बाजारात विक्रीस आणल्यानंतर व्यापारी शेतमाल हमीभाव पेक्षा कमी दराने खरेदी करतो आणि नगदी पैसे देण्यासाठी एक टक्का रक्कम चुकाऱ्यातुन कापतात. अशा व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करून परवाना रद्द करण्यात यावा अशा मागण्याचे निवेदन शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविण्यात आले.
. निवेदनात म्हटले आहे की शेतकऱ्यांच्या मागण्या वर 8 दिवसाच्या आत तोडगा काढण्यात यांवा नाहीतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत वरोरा तालुक्यातील शेतकरी बहिष्कार टाकतील याला जिल्हा व तालुका प्रशासन जबाबदार राहतील असा इशारा ही निवेदनातून देण्यात आला.
. निवेदन देताना शेतकरी नेते किशोर डुकरे, प्रसाद मिलमिले, हनुमान उरकांदे, किशोर विरुटकर, विययक डूकरे, लक्ष्मण आसूरकर, तुळशीराम बावणे, दिपांश नन्नावरे, पुष्पाकर खेवले, महेश वराटकर, ज्ञानेश्वर खीरटकर, देविदास चवले, ऋषीं आत्राम सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.


