Home सामाजिक तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सिंदेवाहीला मिळाले तालुका कृषी अधिकारी

तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सिंदेवाहीला मिळाले तालुका कृषी अधिकारी

1369

सिंदेवाही तालुका कृषी अधिकारी म्हणून कल्याणी आहुटी रुजू

सिंदेवाही : तालुका कृषी अधिकारी कार्यालय सिंदेवाही येथील कृषी अधिकारी पद मागील तीन वर्षांपासून रिक्त असल्याने या ठिकाणी नुकत्याच कल्याणी आहुटी या रुजू झाल्या असून सदर कार्यालयाला पूर्णवेळ तालुका कृषी अधिकारी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

.      सिंदेवाही कार्यालयातील तालुका कृषी अधिकारी पद हे मागील तीन वर्षापूर्वी रिक्त झाल्याने मंडळ अधिकारी ए.आर. महाले यांचेकडे तब्बल तीन वर्ष प्रभार देण्यात आला होता. मात्र मंडळ अधिकारी ए.आर.महाले यांची नाशिक या ठिकाणी बदली झाली असल्याने पूर्णवेळ कृषी अधिकारी म्हणून कल्याणी आहुटी या नुकत्याच रुजू झाल्या आहेत. कल्याणी आहुटी या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील सामान्य कुटुंबातील असून २०२२ मध्ये त्यांची प्रशासकीय सेवेत निवड झाली आहे. त्या सिंदेवाही येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी म्हणून नुकत्याच रुजू झाल्या आहेत. सिंदेवाही तालुक्याला पूर्णवेळ तालुका कृषी अधिकारी मिळाले असल्याने येथील शेतकऱ्यांच्या समस्या लवकर मार्गी लागतील. तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शेतीविषयक योजनांची माहिती तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. या अपेक्षेसह येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!