Home चंद्रपुर जिल्हा विशेष इच्छुक उमेदवारांना आजपासून दाखल करता येणार नामांकन

इच्छुक उमेदवारांना आजपासून दाखल करता येणार नामांकन

1318

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी (दि. २२) जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा यांच्याकडून जारी होणार आहे. त्यानंतर त्याच दिवसापासून इच्छुक उमेदवारांना संबंधित विधानसभा क्षेत्रात नामांकन अर्ज दाखल करतात येणार आहे. हे नामांकन संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहे

.      महायुतीमधील भाजपची राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चिमूर क्षेत्रातून कीर्तिकुमार भांगडिया यांची उमेदवार जाहीर करण्यात आली चंद्रपूर, वरोरा, राजुरा व ब्रम्हपुरी या चार विधानसभा क्षेत्राचे उमेदवार अध्यापही घोषित झाले नाही आणि महाविकास आघाडीतील सर्व जागा वाटपांचा तिढा अजूनही सुटला नाही. त्यामुळे उमेदवार कोण, याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

आजपासून इच्छुक उमेदवारांना आपला नामांकन अर्ज दाखल करता येणार असला तरी उमेदवारी अर्ज भरण्यास या निवडणुकांचा मोठा अनुभव असलेल्यांकडून तत्पूर्वीच डमी अर्ज भरून तो या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तपासून घेतला जात आहे. अर्जासोबत जोडावी लागणारी संपत्तीची माहिती, शैक्षणिक पात्रतेसह अन्य कागदपत्रांची जुळवाजुळव करत इच्छुक उमेदवार सज्ज झाले आहे. मात्र चंद्रपूर, वरोरा, राजुरा व ब्रम्हपुरी या क्षेत्रातील उमेदवार कोण, उमेदवारी कुणाला मिळणार, यावरून शहरी व ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात उत्सुकता वाढली आहे . भाजपने पहिल्या यादीत बल्लारपूर क्षेत्रातून राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चिमूर क्षेत्रातून कीर्तिकुमार भांगडिया यांची उमेदवार जाहीर केली. महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मंगळवारी (दि. २२) निवडणुकीची अधिसूचना जाहीर होईल. त्यानंतर नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करता येईल. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना केवळ आठ दिवस मिळणार आहेत. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. त्याची एक प्रत निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने निवडणूक प्रशासन कामाला लागला. जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रांतील उपविभागीय कार्यालयात यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवारांची मुंबई वारी                                                                                                                                                            चंद्रपूर, वरोरा, राजुरा व ब्रम्हपुरी या चार विधानसभा क्षेत्राचे उमेदवार अध्यापही घोषित झाले नाही. वरोरा विधानसभा क्षेत्रासाठी डझनभर इच्छुक उमेदवार सज्ज आहे. आपल्याला उमेदवारी कशी मिळेल यासाठी वरिष्ठ नेत्यांची मनधरणी करण्यासाठी व शीट खिचून आणण्यासाठी सारेच मुंबईत तळ ठोकून बसलेले आहे. मात्र नेमकी जागा कोणती कोणाला मिळणार आणि किती जण बंडखोरी करणार हे मात्र लवकरच कळणार आहे.

भाजपच्या भाऊ गर्दीत सेना मारणार ताव ?                                                                                                                                   वरोरा विधानसभा क्षेत्र खरे तर शिवसेने साठी अनुकूल होते मात्र दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी ऐन वेळेवर काँग्रेस चा हाथ पकडत या मतदार संघावार आपली छाप दाखवत काँग्रेसमय केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ने चांगलीच आघाडी घेतली. त्यामुळे या मतदार संघावर काँग्रेस चे वचक असल्याचे दिसून येते मात्र युती धर्मात ही जागा कुणाकडे जाणार हे सद्यातरी गुलदस्त्यात आहे तर महायुती मध्ये भाजप कडून अनेकांनी उमेदवारी साठी बार्शीग बांधले. मात्र हा मतदार संघ शिवसेने कडे जाणार असल्याचे समजते. त्यामुळे भाजप च्या कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली असून हा मतदार संघ नेमका कुणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.                                                                                                                                                         वरोरा विधानसभा क्षेत्र भाजप साठी अनुकूल असताना हा मतदार संघ शिवसेनेचे च्या शिंदे गटाला सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली. ही जागा शिंदे गटाला गेली तर 5 वर्षांपासून विधानसभेच्या तयारीत असलेल्या भाजप च्या इच्छुक नेत्यांत मात्र फार मोठी नाराजीची लाट राहणार असून ही नाराजी भाजप ला डोकेदुखी ठरणार आहे.

error: Content is protected !!