बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावरील भिवकुंड येथील घटन
विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न
विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील भिवकुंड परिसरात एक हनुमान मंदिर आहे. या मंदिरातील हनुमान मुर्तीची अज्ञाताने विटंबना केली.यामुळे हनुमान भक्तांच्या भावना दुखावल्या. बल्लारपूर येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घटना स्थळी धाव घेतली. त्यांनी चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस व तहसील कार्यालयाच्या प्रशासनाने त्यांची समजूत काढली. आरोपीला तातडीने अटक करण्याचे आश्वासन दिल्याने त्या ठिकाणी तनाव पूर्ण शांतता आहे. ही घटना शनिवार (दि. १९) रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावरील भिवकुंड येथे उघडकीस आली.
. बल्लारपूर – चंद्रपूर मार्गादरम्यान भिवकुंड मधील नाल्यालगत वळणावर एक हनुमान मंदिर आहे. या मंदिरात पुजा अर्चना करण्यासाठी हनुमान भक्त सकाळी गेला. तेव्हा मंदिरात स्थापित हनुमान मुर्तीची विटंबना केल्याचे त्याला आढळून आले. ही वार्ता हव्याच्या गतीने बल्लारपूर शहरात पोहचली. बल्लारपूर येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व हनुमान भक्तांनी घटना स्थळी धाव घेतली. जमाव जमा झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावली.
. या घटनेची माहिती होताच बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे, पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तहसीलदार अभय गायकवाड व अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांना देखील घटनेबाबत अवगत केले. त्यांनी घटनास्थळी येऊन संतप्त आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. आंदोलनकर्त्यांना रस्ता रोको आंदोलन करण्यापासून परावृत्त केले. आंदोलनकर्त्यांनी हनुमान मुर्तीची विटंबना करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या व्यक्ती ला तातडीने अटक करण्याची मागणी केली. त्याच प्रमाणे मंदिर परिसरात सुरक्षा देण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे लावून धरली. यावर अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक सुनील गाडे व तहसीलदार अभय गायकवाड यांनी सकारात्मक भूमिका घेऊन हनुमान मुर्ती ची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपी ला अटक करण्याचे आश्वासन दिल्याने तनाव निवडला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दोन वर्षापूर्वी झाली होती विटंबना बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावरील भिवकुंड येथील याच मंदिरात २४ नोव्हेंबर २0२२ रोजी हनुमान मंदिरात मुर्तीची विटंबना करण्यात आली होती. त्यावेळी देखील विश्व हिंदू परिषद व हनुमान भक्तांनी जोरदार आंदोलन केले होते. तेव्हा तत्कालीन पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी तनावग्रस्त परिस्थिती सावरली होती. पोलिसांनी त्या घटनेत एका मनोरूग्ण इसमाला अटक केली होती. त्यानंतर मंदिर परिसरात काही प्रमाणात सुशोभिकरण करण्यात आले.त्याच घटनेची पुनरावृत्ती आज झाली.या मुळे भाविकांना मोठा धक्का बसला आहे. अहोरात्र वर्दळीच्या मार्गावर पुन्हा एकदा मंदिरातील मुर्तीची विटंबना झाल्याने विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.


