Home चंद्रपुर जिल्हा विशेष एकाच कालावधीत बि.एड कॉलेज व शाळेत अध्यापनाचे कार्य

एकाच कालावधीत बि.एड कॉलेज व शाळेत अध्यापनाचे कार्य

1295

बोगस बी. एड. धारक शिक्षक मोरेश्वर गौरकार यांचेवर कारवाही कधी होणार?

सिंदेवाही : चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये एका शिक्षकानी नियमित बि. एड करण्यास श्रीकृष्ण शिक्षण महाविद्यालय तळोधी (बा.) जिल्हा चंद्रपूर येथे प्रवेश घेतला व त्याच कालावधीत सुध्दा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणी ता. सिंदेवाही येथे अध्यापनाचे कार्य केले आहे. व वेतन उचल केली आहे. त्यामुळे बी.एड. कालावधीतील संपूर्ण वेतनाची वसुली करून बोगस बी.एड. पदवीच्या आधारे दिलेली पदवीधर शिक्षक पदोन्नतीचे संपूर्ण लाभ रद्द करून संबंधित शिक्षक मोरेश्वर गौरकार यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्वतंत्र जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष डी.बी. उराडे यांनी विभागीय आयुक्त कार्यालय यांचेकडे केलेली आहे.

.       सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणी येथे तत्कालीन कार्यरत शिक्षक मोरेश्वर गौरकार यांनी त्याच कालावधी मध्ये श्रीकृष्ण शिक्षण महाविद्यालय तळोधी (बाळापूर) येथे नियमित व पूर्णवेळ बी एड. अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतला होता. मात्र त्या कालावधी मध्ये शिक्षक मोरेश्वर गौरकार हे आपल्या शिवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हजर राहून कर्तव्य बजावू शकले नाही. ही बाब सत्य असून नाकारता येण्यासारखी नाही. त्यांनी विना अनुमती पूर्णवेळ अभ्यासक्रम केलेला आहे याचा अर्थ प्रशासनास अंधारात ठेवून दिशाभुल केली व आर्थिक फसवणुक केली आहे. सदरची बाब अतिशय गंभीर असून भादंवि कायद्यातील तरतुदीन्वये गुन्हा घडलेला आहे.

.       तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांने सदर शिक्षक यांचे बि. एड. कालावधीचे संपुर्ण वेतन वसुली करणे, विभागीय चौकशी करणे व बोगस पदवीचा भविष्यात कुठलाही लाभ देता येणार नाही असे कार्यालयीन टिपणीत लेखी निर्णय घेतला होता.मात्र शिक्षण विभागाकडून निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे शिक्षक मोरेश्वर गौरकार ला पदविधर शिक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली ही सुध्दा अतिशय गंभीर बाब आहे. तथापि १० वर्षाचा कालावधी पार पडून देखील सदर निर्णयाची समाधानकारक अंमलबजावणी झालेली नाही. शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी ,उप शिक्षणाधिकारी , सहायक प्रशासन अधिकारी ,टंकलिपीक यांने संगनमताने अंमलात आणला नाही त्यामूळे जबाबदारीच्या प्रमाणात शिक्षण विभागाचेच अधिकारी/कर्मचारी जबाबदार आहेत हे नाकारता येण्यासारखे नाही. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

.       बोंगस पदवी प्रमाणपत्राचे आधारे शिक्षकाला पदोन्नती मिळाल्यामूळे पात्रता धारण करणाऱ्या कर्मचा-यांवर अन्याय झाला आहे हे नाकारता येत नाही. पात्रता धारण करणारे कर्मचा-याला जाणीवर्पूक डावलण्यात आल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. विहीत अर्हता प्राप्त नसलेल्या कर्मचाऱ्यांस पदोन्नती देणे ही बाब निश्चितच अवैध ठरते. असा कर्मचारी त्याच्या मूळच्या पदावर पदावनतीने नेमण्यास पात्र ठरतो. उक्त प्रकरणात दोन निर्णय घेणे नियमानुसार आवश्यक आहे . सदर शिक्षक यांना त्यांचे बोगस बि.एड.पदवी प्रमाणपत्राचे आधारे दिलेली पदोन्नती रद्य करणे, व जबाबदारी निश्चित करणे. बि.एड. अभ्यासक्रमाचे कालावधीतील वेतन व्याजासह वूसली करणे,फौजदारी गुन्हा नोंदविणे , विभागीय चौकशी प्रस्तावित करणे. याबाबत वरिष्ठांना कळवून सुद्धा दखल घेतली जात नाही असे दिसून येते. याप्रकरणी कारवाई प्रस्तावित केल्यास जिल्हा परिषद चंद्रपूर चे पितळ उघडे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकाच कालावधीमध्ये बी.एड. कॉलेज व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपस्थिती दर्शवून अवैध्य व असंविधानिक पने बी.एड. अभ्यासक्रम करून शासनाची फसवणूक केली असल्याने बी एड कालावधीतील संपूर्ण वेतनाची वसुली करून , बी एड पदवीच्या आधारे दिलेली पदवीधर शिक्षक पदोन्नतीचे संपूर्ण लाभ रद्द करावे, आणि संबंधित शिक्षक मोरेश्वर गौरकार यांचेवर फौजदारी कारवाई करावी. अशी मागणी डी.बी. उराडे यांनी केली आहे.

error: Content is protected !!