नागभीड : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर व सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) विभाग, चंद्रपूर यांच्या वतीने शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, कोसंबी गवळी येथे मुलींचे वस्तीगृह इमारतीचे नुकतेच ना. डॉ. विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते ॲानलाईन पद्धतीने पार पडले. या ऑनलाइन वस्तीगृह इमारतीचे भूमिपूजन करिता विजय वाघमारे (भा.प्र.से) सचिव आदिवासी विकास विभाग, नयना गुंडे (भा.प्र.से) आयुक्त आदिवासी विकास नाशिक, रवींद्र ठाकरे (भा.प्र.से) अपर आयुक्त नागपूर, प्रवीण लाटकर (प्रकल्प अधिकारी) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर उपस्थित होते.
. शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर भांडारकर यांनी परिसरातील सर्व मान्यवर तसेच पालकांना शाळेत निमंत्रित करण्यात आले होते. सचिव वाघमारे यांनी मुलींच्या वस्तीगृहाचे व शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. परदेशी शिक्षणाच्या संधी, नमो विज्ञान लॅब, डिजिटल साधनांची उपलब्धता, येत्या तीन वर्षात सर्व शाळेत परिपूर्ण निवास व्यवस्था, कला शिक्षक, क्रीडा शिक्षकांची उपलब्धता, विद्यार्थ्या करिता शनिवार व रविवारला ऑनलाइन तज्ञ मार्गदर्शन सुविधा उपलब्ध, विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासाठी करिता शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल अशी विविध माहिती मान्यवरांनी सांगितली.
. कोसंबी शाळेमध्ये प्रत्यक्ष भूमिपूजन सोहळा संजय गजपुरे , माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर यांच्या हस्ते विधिवत पार पाडत फलक अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भांडारकर यांनी केले. कार्यक्रमाकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग (आदिवासी) चंद्रपूरच्या वतीने उपअभियंता गायकवाड, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे वटाणे सर (क शि. वि. अ) उपस्थित होते.
. याप्रसंगी मंचावर दिलीप रंदये सरपंच कोसंबी गवळी, दयाराम कन्नाके आदिवासी सेवक, भैय्या दडमल अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, धनराज ढोक संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नागभीड, प्रमोद दडमल अध्यक्ष तंटामुक्ती समिती, कैलास रंधये, परमेश्वर कुंभरे, विनोद दडमल, सचिन हनवते, आसाराम मडावी, बहुसंख्य पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.


