सागर शंभरकर या शिक्षकांचा आरोप
सिंदेवाही : जिल्हा परिषद चंद्रपूर शिक्षण विभाग कडून दिनांक १४ आक्टोंबर २०२४ ला उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती पदाची समुपदेशन प्रक्रिया पार पडली होती. पदोन्नती समुपदेशन यादीत शिक्षक सागर शंभरकर यांचे पात्र यादीत नाव असताना केवळ सिंदेवाहीचे गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे यांचे चुकीच्या अभिप्रायामुळे शिक्षक शंभरकर यांचे नाव पदोन्नती यादीत अपात्र झाले असल्याचा आरोप शंभरकर यांनी केला असून याबाबत जिल्हा निवड समितीच्या विरोधात आक्षेप घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.
. जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत नुकतेच पदोन्नती यादी प्रसिद्ध करण्यात आली. पदोन्नती करिता जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आली असून ती निवड समिती अनभिज्ञ असल्याचे यावरून दिसून आले आहे. ११.१०.२०२४ चे पत्रानुसार पदोन्नती समुपदेशन प्रक्रिया राबविण्यासाठी 14.10.2024 रोजी उपस्थित राहण्याचे निर्देश होते. परंतू गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिंदेवाही यांच्या चुकीच्या व दिशाभूल माहितीच्या आधारे पदोन्नती समुपदेशन प्रक्रियेत सहभागी करून घेतले नाही. विभागाने आयोजित केलेल्या डी.पी.सी.च्या बैठकीत माझे विरुद्ध विभागीय चौकशी आदेशित नव्हती.त्याअर्थी पदोन्नतीस पात्र असतानाही गटशिक्षणाधिकारी यांनी पाठविलेल्या चुकीच्या व स्वतः कडीला माहितीच्या आधारे डावलने बेकायदेशीर व अन्यायकारक आहे.
. सदर शिक्षक विरुद्ध ज्यावेळी डीसीपी बैठक घेण्यात आली त्या बैठकीच्या दिवशी शिक्षक पदोन्नतीला पात्र होते.कारण विभागीय चौकशी आदेशित झालेली नव्हती.आजपर्यत सुद्धा विभागीय चौकशीचे आदेश बजावण्यात आले नाही. के.व्ही.जानकीरामन विरुद्ध भारत सरकार प्रकरणात मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.27.08.1991 रोजी दिलेल्या निवाड्याप्रमाने सदर शिक्षकाचा विचार होणे कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक असतानाही डी.पी.सी.बैठकित विचार न करणे हा अन्याय आहे. अन्यायाविरुद्ध प्रकरणाचे पुनश्च तपासणी करावी व मा.सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय पालन करणे कायद्याने बंधन असल्याने , कोणताही विलंब लावता पदोन्नतीचे आदेश जारी होण्यापूर्वी अन्याय दूर करण्यासाठी सदर शिक्षकाने सदस्य-सचिव शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांना निवेदन सादर केले आहे. वास्तविकता सिंदेवाही गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे यांनी कोणतेही दस्तऐवज नसताना नियमबाह्य अभिप्राय नोंद केला असल्याने शिक्षक सागर शंभरकर हे पदोन्नती पासून मुकले असल्याने जिल्हा पदोन्नती निवड समिती तथा गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे यांचेबाबत संताप व्यक्त करीत पदोन्नतीचे आदेश जरी होण्यापूर्वी झालेला अन्याय दूर करण्यात यावा . याकरिता शिक्षक सागर शंभरकर यांनी आक्षेप निवेदन सादर केले आहे.
पदोन्नती निवड समितीने अपात्र केले सिंदेवाही पंचायत समिती शिक्षण विभागाकडून सागर शंभरकर यांचे पदोन्नती साठी जिल्हा परिषद कडे पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच पदोन्नती यादीमध्ये पात्र म्हणून नाव असताना अचानक जिल्हा परिषद पदोन्नती निवड समितीने शंभरकर यांना अपात्र केले आहे. किशोर पिसे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सिंदेवाही.


