Home सामाजिक भारतीय रेल्वेच्या वतीने स्वच्छता ही सेवा २०२४ अभियान

भारतीय रेल्वेच्या वतीने स्वच्छता ही सेवा २०२४ अभियान

1326

नागभीड : भारतीय रेल्वे च्या वतीने स्वच्छ भारत मिशन ला यशस्वी १० वर्षे पुर्ण झाल्याबद्दल “ स्वच्छता ही सेवा २०२४” हे अभियान राबविल्या जात आहे. या अभियाना अंतर्गत दपुम रेल्वे बिलासपुर झोन अंतर्गत रेल्वे परिसर, गाड्या व सर्व इमारत परिसर या ठिकाणी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या थीमनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात आहे.

.      या अभियाना अंतर्गत दपुम रेल्वे नागपुर मंडल च्या नागभीड जंक्शन रेल्वे स्टेशन परिसरात दपुम रेल्वे बिलासपुर झोन चे झेडआरयुसीसी सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सोबतच त्यांना ट्रीगार्ड द्वारे संरक्षितही करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातुन प्रवाशांना स्वच्छते प्रती जागरुकता आणणे व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची सर्वोत्तम व्यवस्था निर्माण करणे तसेच वृक्षारोपणा द्वारे निसर्गाचे संवर्धन करणे हा मुख्य उद्देश आहे.

.     या अभियान प्रसंगी संजय गजपुरे यांच्यासह रितेश नगराळे, मुख्य स्टेशन प्रबंधक, नागभीड, नितिन पाटील, मुख्य वाणिज्य निरिक्षक, रविन्द्रकुमार, उपनिरीक्षक रेल सुरक्षा बल, विष्णु हजारे, मुख्य वाणिज्य लिपिक, धनराज पांडव, मुख्य वाणिज्य लिपिक, जि. एस. बेलेकर, प्रधान आरक्षक रेल सुरक्षा बल, उत्तम कंगाले, पुरुषोत्तम दुधपचारे, लोकेश वासनिक, अर्सि खान यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!