अस्मितेसाठी फुंकले रणशिंग
कोठारी : मागील 9 ऑगष्ट पासून काही संघटनानी क्लब ग्राउंड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी केलेल्या मागण्यांना सर्वसमावेशी आणि व्यापक रूप प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेचा दिनांक 11 ऑक्टोबर रोज शुक्रवारला ‘एल्गार महामोर्चा’ निघणार आहे. भन्ते ज्ञानज्योती (संघरामगिरी) यांचे नेतृत्वात दुपा. 12- 30 वा. हा मोर्चा मेन रोड , चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यापासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
. यात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, अ.भा. रिपब्लिकन पक्ष, भीम आर्मी, रिपब्लिकन पक्ष (खोरीप) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहुजन एम्प्लाईज फेडरेशन ऑफ इंडिया, फुले- आंबेडकर विचार संवर्धन समिती, बामसेफ, मूलनिवासी संघ, आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसीएशन, बुद्धिस्ट समन्वय कृती समिती, कास्ट्राईब संघटना, बानाई, बहुजन युवा कृती समिती ग्रामीण ता. चंद्रपूर सहित सर्वच पक्ष संघटना सहभागी असणार आहेत. हा मोर्चा अत्यंत शिस्तबध राहणार असून आंबेडकरी सामाजिक चेतना निर्माण करणारा ठरेल, असे एका पत्रपरिषदेत मुख्य संयोजक तथा बहुजन हितकारिणी सभेचे संस्थापक अध्यक्ष व वंचित नेते बंडू नगराळे यांनी सांगितले आहे.
. सदर पत्रपरिषदेला खुशाल तेलंग, शिरीष गोगुलवार, देशक खोब्रागडे , किशोर तेलतुंबडे, प्रवीण ( बाळू ) खोब्रागडेचे प्रतिनिधी प्रतिक डोर्लीकर, सुरेश नारनवरे, मृणाल मेश्राम, सुरेंद्र रायपूरे, राजकुमार जवादे, अंकुश वाघमारे, सत्यजित खोब्रागडे, जितेंद्र डोहने, राजस खोब्रागडे, मुन्ना खोब्रागडे, कोमल रामटेके, विद्याधर लाडे, रवींद्र मोटघरे, अॅड. पूनमचंद वाकडे, अशोक बनकर, प्रेमदास बोरकर, गीता रामटेके, सेवकदास बरके, देवानंद रायपूरे, विशाल रंगारी इ. सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते.
. सदर मागण्यांच्या निवेदनाच्या प्रती एड. प्रकाश आंबेडकर, बहन मायावती, खा. चंद्रशेखर आझाद, एड. सुरेश माने यांना पाठवून महाराष्ट्र शासनाकडे याचा पाठपुरावा करण्यासाठी कुशल मेश्राम , शिरीष गोगुलवार, भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, बी. आर. एस. पी. चे विदर्भ महासचिव एड. भूपेन रायपूरे हे प्रयत्न करीत असल्याने चंद्रपूरच्या दीक्षाभूमी आणि उपरोक्त स्मारकाचा मुद्दा लवकरच वरच्या स्तरावर पोहोचेल असे बोलल्या जात आहे .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीनेही चांदा क्लब ग्राउंड दीक्षाभूमीसाठी स्थायी / अस्थायी स्वरूपात देण्यात यावे अशी मागणी कालपरवाच केल्याने आंबेडकरी जनतेने या मुद्याना अस्मितेचे केल्याचे स्पष्ट आहे.
. शेवटी सदर एल्गार महामोर्चाला वेळेवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दिलीप वावरे, अशोक रामटेके, भारत थुलकर, प्रा.इसादास भडके, अशोक निमगडे, स्नेहल रामटेके, हरीश सहारे, नरेन गेडाम, राजेश वनकर, प्रा. टी. डी. कोसे, प्रशांत रामटेके, धर्मेश निकोसे, अ.वी. टेम्भरे , प्रा.कोमल खोब्रागडे, अॅड शंकर सागोरे, धनंजय मेश्राम, विवेक कांबळे, पंकज ताळे, बंडू ठमके, बुद्धप्रकाश वाघमारे, रत्नाकर साठे, सुभाष पेटकर, अशोक फुलझेले, लता साव, कृष्णाक पेरकावार, संदीप सोनोने, भैय्या मानकर, अश्विन खोब्रागडे इ. नी केले आहे .


