तालुक्यातुन शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव
नेरी : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तपोभूमीला लागून असलेल्या व नेरी जवळील खांबाडा येथील सुपरिचित मृदू स्वभावाचे मनमिळाऊ डॉ गोपीचंद गजभे यांचा राष्ट्रीय स्तरावरील इलेक्ट्रो होमिओपॅथी संशोधक डॉक्टरच्या यादीत समावेश झाल्याबद्दल सर्वच स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
. खांबाडा येथील डॉ गजभे हे मागील 25 वर्षांपासून इलेक्टरो होमिओपॅथी या क्षेत्रात कार्यरत असून रुग्णांना सेवा देत आहेत या क्षेत्रात अनेक प्रकारचे संशोधन त्यांनी केले असून आतापर्यंत हजारो रुग्णांना त्यांनी सेवा दिली अनेक रुग्णाची निःशुल्क सेवा केली आणि त्यामुळेच ते गोरगरिबांचे डॉक्टर असल्याचे प्रसिद्ध आहेत त्यांच्या याच सेवेचा आणि अनुभवाची दखल राष्ट्रीय स्तरावर झाली आणि त्यांच्या क्लिनिक ची राष्ट्रीय पातळीवर समावेश करण्यात आला असून या क्षेत्रात प्राविण्य म्हणून राष्ट्रीय यादीत त्यांचे नाव संशोधक म्हणून समाविष्ट करण्यात आले त्याबद्दल तालुक्यातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे चिमूर तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे असे गौरव उदगार अनेकांनी काढले आहे.


