Home चंद्रपुर जिल्हा विशेष मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअप ला ट्रकची धडक

मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअप ला ट्रकची धडक

1382

 25 महिला मजूर जखमी

नागभीड : उमरेड तालुक्यातील धुरखेडा येथे सोयाबीन कापणीसाठी घेऊन जात असलेल्या पिकअप वाहणाला अज्ञात ट्रकने जबर धडक दिली. यात पिकअप वाहनातील 25 मजूर जखमी झाल्याची घटना नागभीड नागपूर मार्गांवरील कानपा फाट्याजवळ मंगळवारी सकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान घडली.

.      प्राप्त माहितीनुसार चिमूर तालुक्यातील साठगाव, येथील पुंडलिक मोहिनकर यांच्या मालकीच्या पिकअप क्रमांक एम.एच. 34 बी.जि. 1720 या वाहनाने सॊयाबीन कापणीसाठी नागभीड, डोंगरगाव, कसरला, पेंढरी येथील 20 ते 25 महिला मजूर उमरेड तालुक्यातील धुरखेडा येथे नेत असतांना नागपूर कडून येणाऱ्या अज्ञात ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक निष्काळजीपणे चालवून पिक अप वाहनाला नागभीड – नागपूर हाय वे वर कानपा जवळ धडक दिली. यात पिकअप वाहणातील 20 ते 25 महिला जखमी झाल्या असून सर्व जखमी महिलांना भुयार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर अज्ञात ट्रक चालका विरुद्ध कलम 304/24 कलम 281, 125(अ) 125 (ब), भारतीय न्याय सहिंता क्र. 184,,134/177 मोबाका नुसार नागभीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास नागभीड पोलीस स्टेशन चे ठाणेदार अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार हनवते, सहा. पोलीस हवालदार सोनवाने, संजय मांढरे करीत आहेत.

error: Content is protected !!