Home सामाजिक सिंदेवाहीत “वंचित” चा बौद्ध समाज संवाद कार्यक्रम

सिंदेवाहीत “वंचित” चा बौद्ध समाज संवाद कार्यक्रम

1352

समाजातील अनेक बुद्धिजीवी वर्ग उपस्थित

सिंदेवाही : देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय संविधान धोक्यात असून ती बदलण्याची व्यूहरचना सुरू असल्याची खोटी अफवा बौद्ध समाजात पसरवून कांग्रेस पक्ष आपली गेलेली पत राखण्यात यशस्वी झाला. आणि त्याचा फटका वंचित बहुजन आघाडीला बसला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बौद्ध समाजाने खोट्या अफवापासून सावध राहून ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करावे. यासाठी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी कडून बौद्ध समाज संवाद मेळावा घेण्यात येत असून गुरुवारी सायंकाळी ७ वाजता सिंदेवाही येथील भंते शोभीत मैत्रेय बुद्ध विहार येथे बौद्ध समाज संवाद कार्यक्रम घेण्यात आला.

.       समाजातील बुद्धिजीवी डॉक्टर, वकील, इंजिनियर, लेखक, पत्रकार, तथा सामाजिक चळवळीतील प्रखर व्यक्तिमत्वानी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सजग राहून मागील निवडणुकीची पुनरावृत्ती टाळावी, कांग्रेस पक्षाने मागील निवडणुकीत संविधान धोक्यात आले. ते वाचवण्यासाठी आम्हालाच मतदान करा. असा खोटा  आणि बनावट प्रचार करून बौद्ध समाजाची मते मिळवली. मात्र त्या पक्षाला संविधान बद्धल काहीच देणे घेणे नाही. असे असताना सुद्धा बौद्ध समाज खोट्या आणि बनावट प्रचाराला बळी पडला. त्या प्रचाराची पुनरावृत्ती होऊ नये, आणि बौद्ध समाजाने आपले राजकीय अस्तित्व संपवू नये यासाठी ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शनात अशोक सोनोने, राजेंद्र पातोडे, अमित भुईगळ, यु जी बोराडे, प्रा. मनोज निकाळजे, यांनी संपूर्ण महाराष्ट्रात बौद्ध समाज संवाद दौरा सुरू केला असून गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे सायंकाळी ७ वाजता भंते शोभित मैत्रेय बुद्ध विहार येथे संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी मान्यवर पाहुण्यांनी येणाऱ्या काळात बौद्ध समाजावर धोके काय असतील ? बौद्धांची कर्तव्य आणि जबाबदारी काय ?  याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा पूर्व चे जिल्हाध्यक्ष डॉ.राजपाल खोब्रागडे, सिंदेवाही तालुकाध्यक्ष अंबादास कोसे, सरचिटणीस प्रा.जगदीश सेमस्कर, भैयाजी निमगडे, कोमल गेडाम, विजय घडसे, संघपाल डांगे, प्रा.मेश्राम, केवळराम साहरे, भीमराव खोब्रागडे, महिला अध्यक्ष शुभांगी खोब्रागडे, शांताबाई पाजारे, संगीता खोब्रागडे, सुजाता चाहांदे, कुंदा शेंडे, पौर्णिमा डांगे, यांचेसह समाजातील बुद्धिजीवी वर्गातील असंख्य महिला पुरुष उपस्थित होते.

error: Content is protected !!