Home चंद्रपुर जिल्हा विशेष नागभीड नगरपरिषदवर महीलांचा घागर मोर्चा 

नागभीड नगरपरिषदवर महीलांचा घागर मोर्चा

1350

चिमुर विधानसभा काँग्रेसचे समन्वयक सतिश वाजुकर यांचे नेतृत्व

नागभीड : ऐन पावसाळ्यात नगर परिषद क्षेत्रात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. चार दिवसापासून नाल योजना ठप्प आहे. यामुळे संतापलेल्या महिलांनी चिमुर विधानसभा काँग्रेसचे समन्वयक सतिश वाजुकर यांच्या नेतृत्वात नागभीड नगर परिषदवर महिलांचा घागर मोर्चा धडकला.

.        नागभीड नगर परिषद विविध समस्यांचे माहेरघर बनले आहे. पिण्याच्या पाण्याची ज्वलंत समस्येवर नगरपरिषद क्षेत्रातील जनतेला न्याय मिळत नाही. या मागणीसाठी नागभीड तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारला नगरपरिषदेवर महिलांचा घागर मोर्चा काढला. जुना बस स्थानकावर या मोर्चाला प्रारंभ करुन शहरातील गोवर्धन चौक, महादेव मंदीर, पटेल चौक, कुंभार मोहल्ला, राम मंदिर चौक, आदिवासी चौक, प्रियदर्शनी चौक, बिक्केवार चौक, गंगा माता चौक, बाजार चौकातून हा मोर्चा महिलांच्या घोष वाक्याने दणानुन सोडत नगरपरिषदवर धडकला. ११ एप्रिल २०१६ रोजी नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. त्यात नागभीड सह, नवखळा, डोंगरगाव, बाम्हणी, चिखलपरसोडी, सुलेझरी, भिकेश्वर, खैरीचक, तुकुम, तिव्हर्ला या गावांचा समावेश करण्यात आला. या नगरपरिषद मध्ये प्रचंड कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे, नागभीड नगरपरिषद अंतर्गत चार-चार दिवस नळाला पाणी मिळत नाही, नगरपरिषद क्षेत्रातील निवासी अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकुल करुन पट्टे वाटप झाले पाहिजे.

.        अशा विविध मागण्या या घागर मोर्चात होत्या. त्यानंतर जनता महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात सुशिक्षित बेरोजगारांची घंटानाद निषेध सभा आयोजित करण्यात आली.या सभेला गडचिरोली -चिमुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ नामदेव किरसान,आमदार.अभिजित वंजारी, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सहसचिव कृणाल चौधरी, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, माजी प्राचार्य डॉ. अमीर धम्मानी, मुजाहीन पठान न. प. माजी. गट नेते दिनेश गावंडे,यांनी सभेत मार्गदर्शन केले.त्याच बरोबर चिमुर विधानसभेचे समन्वयक डॉ.सतिश वारजुकर यांनी सभेला मार्गदर्शन करताना म्हणाले की, नगरपरिषदेतील भाजपाचे माजी सत्ताधारी पदाधिकारी यांचा चांगलाच खरपूस समाचार घेऊन त्यांनी पाच वर्षे नगरपरिषद मध्ये  कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे, असे प्रतिपादन केले. मंचकावर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, जि. प. माजी सदस्य पंजाबराव गावंडे, रविंद्र कावळे, माजी जि. प. सदस्य, खोजराम मरसकोल्हे, पुरषोत्तम बगमारे, शरद टिपले, नितु गुरपुडे, निलीमा भुरे, सुनिता डोईजड, मंजुषा नारायणे यांची उपस्थिती होती.

.        मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रतीक भसीन, किशोर समर्थ, नरेंद्र हेमणे, महेश कुर्झेकर, संदीप सातव, अमोल वानखेडे, गणेश पुंडे, तरबेज शेख, प्रशांत गेडाम, हरिष मुळे, नाशिर शेख, संकेत वारजुकर, रविंद्र बळी, अमित संदोकर, संतोष सोनुले, विजय अमृतकर, यांनी परिश्रम घेतले, सभेचे संचालन तालुका महीला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा प्रणया गड्डमवार यांनी केले. सभेला बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!