तहसीलदार पानमंद यांचे उपस्थितीत संजय गांधी योजनेची बैठक
सिंदेवाही : तहसील कार्यालय सिंदेवाही अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेची बैठक २७ सप्टेंबर रोजी तहसीलदार संदीप पानमंद यांचे उपस्थितीत आयोजित करण्यात आली असून यामध्ये एकुण संजय गांधी निराधार योजने संबंधित १९९ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
. संजय गांधी निराधार या योजनेची तालुका स्तरीय निवड समिती असून या समिती मार्फत निराधार असलेल्या लाभार्थ्यांच्या अर्जाना मंजुरी देण्यात येते. त्या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष कमलाकर सिध्दमशेट्टीवार यांचे अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार संदीप पानमंद यांचे प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या ५६ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली , श्रावणबाळ योजनेच्या ७९ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली.
. राष्ट्रीय अपंग योजनेमध्ये एकूण ०२ पात्र लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली.राष्ट्रीय विधवा योजनेमध्ये- १३ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली असुन , वृद्धपकाळ योजनेमध्ये एकुण ४९ पात्र लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली , तर ०५ अर्ज छाननी मध्ये अपात्र करण्यात आले. अशी माहिती समितीचे अध्यक्ष कमलाकर सिध्दमशेट्टीवार यांनी दिली. यावेळी तहसीलदार संदीप पानमंद यांचे सह संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार देशमुख, समितीचे सदस्य राजू नंदनवार, किशोर भरडकर, देवराव कोठेवार, छाया हाडगे, मुरलीधर मडावी, सहारे, ढेंगे, गायकवाड व इत्यादी सर्व संजय गांधी निराधार योजनेचे समितीचे सदस्य व कर्मचारी, ऑपरेटर गोपीचंद मोहर्लै, रहाटे हे उपस्थित होते.


