प्रबोधन विचार मंच व युवा मंच चंद्रपूर चे आयोजन
वरोरा : प्रबोधन विचार मंच व युवा मंच चंद्रपूरच्या वतीने सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वरोरा येथे प्रबोधन सम्मेलन पार पडले. यावेळी अध्यक्षीय भाषणात विनोद सोनटक्के यांनी सुशिक्षित तरुण आणि महिला यांना व्यवसाय नौकरी आणि पैसा या विषयाला अनुसरून नौकरी किंवा व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक बाबी व अडथळे यासंबंधी उत्तम मार्गदर्शन केले.
. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य संयोजक विनोद आर सोनटक्के प्रबोधन विचार मंच व युवा मंच चंद्रपूर यांनी भुषविले तर उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता ॲड भुपेंद्र रायपुरे, भद्रावती यांचे हस्ते करण्यात आले. मुख्य मार्गदर्शक राज गायकवाड, नागपूर तसेच संजय थुल, नागपूर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अधिक्षक अभियंता महावितरण संध्या चिवंडे चंद्रपूर, शिक्षण विस्तार अधिकारी संदिप चौधरी जिवती, ॲड अरविंद पेटकर, भाऊराव चिवंडे, आनंदराव वानखेडे, नरेंद्र कन्नाके इत्यादी उपस्थित होते.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना कडू यांनी तर पाहुण्यांचे स्वागत ईशा रामटेके यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुजा उमरे यांनी तर आभार निवेदिता पेटकर यांनी मानले. कार्यक्रमाचच्या यशस्वीतेसाठी प्रबोधन विचार मंच व युवा मंच चंद्रपूर च्या सर्व संयोजकांनी मेहनत घेतली . तसेच सदर कार्यक्रमास वरोरा शहरातील विद्यार्थी- पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


