ब्रम्हपुरी : माता रमाई बुध्दिझम परिचय, ब्रम्हपुरी यांच्या विद्यमाने 06 आक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे निःशुल्क बौद्ध धम्मीय उपवर-वधू परिचय व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
. विदर्भस्तरीय बौद्ध धम्मीय मेळाव्यात उपवर-वधूंचा परिचय होणार असून त्यांना मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उपवर-वधूंची नोंदणी मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 10 ते 11 वाजताच्या दरम्यान मेळाव्याच्या दिवशी करण्यात येणार आहे. उपवर-वधूंनी मेळाव्यात येतांना एक फोटो सोबत आणावा. या मेळाव्यात उपवर-वधूं , घटस्फोटीत, विधवा, विधुर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन रमेश बागडे, घनश्याम रामटेके यांनी केले आहे


