वरोरा : शहरालगत आलेल्या चिनोरा या गावातील युवकांनी जिद्द चिकाटी व परिश्रम करून आर्मी, एस आर पी एफ व महाराष्ट्र पोलीस मध्ये दहा मुलांची निवड झाली. ते काही दिवसातच ट्रेनिंगला जाणार आहे. त्यांचा चिनोरा ग्राम पंचायत व गावकर्यांच्या वतीने भव्य सत्काराचा कार्यक्रम करण्यात आला होता.
. या कार्यक्रमाला चिनोर्याचे सरपंच ताई परचाके, उपसरपंच वंदना ढेगळे गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी पंचायत समिती सदस्य अविनाश ढेगळे, ग्रामपंचायत सदस्य निलेश डोंगरकर, ज्योती गायकवाड, अनिता बोथले व तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश कांबडी व चाफले व ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी व गावातील नागरिक व सर्व सत्कारमूर्ती युवक हजर होते. यावेळी सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त केले. व या युवकांचे कौतुक केले.


