Home चंद्रपुर जिल्हा विशेष दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; 1 गंभीर, 5 जखमी

दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; 1 गंभीर, 5 जखमी

1349

नेरी तळोधी मार्गावरील अडेगाव (को) वळणावरील घटना

नेरी : नेरी तळोधी मार्गावर अडेगाव (को) वळणावर दोन दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाली. या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून 5 जण जखमी झाले. जखमीत लहान 2 बालकाचा समावेश आहे. सदर घटना रविवारी( दि 29 )ला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घडली. सर्व जखमींना खासगी वाहनाने तळोधी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.

.        नेरी तळोधी मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते आज रविवार असल्याने सात बहिणीच्या टेकडीवर पर्यटनासाठी पर्यटक मोट्या संख्येनी येत असतात याच पर्यटकांपैकी नागपूर येथील पर्यटक टेकडीकडे पर्यटनासाठी दुचाकी क्रमांक एम एच 49 बी एच 7567 जात असताना ,वैजापूर येथील प्रमोद थेरकर वय 50 वर्षे पत्नी रूपा थेरकर वय 42 वर्षे अंदाजे एक मुलगा एक मुलगी वय अंदाजे 5ते 7 दरम्यान दुचाकी क्रमांक एम एच 34 सि ए 1744 सिरपूर येथे भेट देण्यासाठी जात असताना वाटेत अडेगाव जवळील शिव मंदिराजवळ दोन्ही दुचाकीचा समोरासमोर धडक देऊन भीषण अपघात झाला अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे समोरील चाक तुटून स्फोट झाला तसेच दुचाकीचे समान तुटले यात नागपूर येथील दुचाकी स्वार अति गंभीर असून थेरकर यांचे पाय तसेच मुलीचा हात तुटल्याचे बोलले जात असून सर्वच जण गंभीर जखमी झाले आहेत सदर घटनेची माहिती होताच रस्त्यावरील जाणाऱ्या लोकांनी त्यांना उचलून पांनी पाजले व खासगी वाहनाने तळोधी येथे उपचारासाठी पाठविले सदर घटनेचे वृत्त लिहिपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल व्हायचे होते.

error: Content is protected !!