वरोरा : राष्ट्रीय कुणबी महासंघाचे काम (कार्य) संघटन संपूर्ण देशात मजबूत करण्याचे उद्देशाने राष्ट्रीय कुणबी महासंघाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय कुणबी महासंघामध्ये काम करण्याची इच्छाशक्ती, कुणबी समाजातील काम, सेवाभावी वृत्ती व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड विचारात घेऊन सामाजिक कार्यकर्ते विलास नेरकर यांची राष्ट्रीय महासचिव पदी कुणबी महासंघ अध्यक्ष डी. के. आरीकर यांनी नियुक्ती केली आहे.
. राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधून दिलेल्या संघटनेच्या नियमानुसार काम करून राष्ट्रीय कुणबी महासंघाचे संघटन वाढविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे विलास नेरकर यांनी सांगितले आहे.


