Home चंद्रपुर जिल्हा विशेष चक्क दारुबंदी समितीच्या सदस्याला दारूविक्रेत्यानी गांजा ठेवून फसविले

चक्क दारुबंदी समितीच्या सदस्याला दारूविक्रेत्यानी गांजा ठेवून फसविले

1349

लोहारा गावातील खळबळजनक प्रकार

नेरी : चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या लोहारा या गावात दारुबंदी समिती , तुमस समिती व गावातील महिला मंडळी यांनी पुढाकार घेऊन गावातील अवैध रित्या विक्री होत असलेल्या दारूची विक्री बंद करण्याचा निर्णय घेऊन दारू विक्री बंद केली. अवैध दारू विक्री बंद केली त्यामुळे अवैध दारूविक्रेते हे भडकले त्यांच्या मनात दारुबंदी समितीच्या सदस्यांच्या बदल प्रचंड राग निर्माण झाला तेव्हा अवैध दारूविक्रेत्यानी गांजा विकत घेऊन दारुबंदी समितीच्या सदस्याच्या दुचाकी मध्ये गांजा लपवून ठेवून स्वतःच पोलीस स्टेशनला फोन केला आणि समितीच्या सदस्याला अटक करायला लावली असा भयंकर तेवढाच संताप जनक प्रकार घडल्याने परिसरात एकच खडबळ उडाली असून सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

.      भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोहारा गावात मागील अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने दारूची अवैध विक्री सुरू होती. दारू तस्कर बिनधास्त दारूची विक्री करीत होते. मात्र या दारूमुळे गावातील अनेक तरुण नागरिक मरण पावले. गावात भेटत असल्याने एक गाव बारा भानगडी सुरू झाल्या होत्या. अनेकदा पोलीस विभागाला माहिती देऊनही फक्त काही दिवस बंद व्हायची आणि पुन्हा सुरू व्हायची त्यामुळे दारूविक्रेते सैराट झाले होते. आपले कुणीही काही करू शकत नाही या रुबाबात ते नेहमी वागत होते. मात्र या दारूच्या व्यसनाने अनेक तरुणांना आजार जडले तसेच अनेक तरुण मरण पावल्यानी गावातील महिला पुरुषांनी आता गाव दारूमुक्त करण्याचा विचार केला आणि एक आठवडा पूर्वी दारुबंदी समिती तंमुस समिती व महिला मंडळीने पुढाकार घेऊन गावात दारुबंदी केली व सैराट दारूविक्रेते यांना तंबी दिली.

.      गावातील दारूविक्री बंद केल्याने अवैध दारूविक्रेते संतापले आणि याचा वचपा काढण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या दारुबंदी समितीच्या सदस्याला फसवायचे ठरविले तेव्हा दि 22 सप्टेंबरला दारुबंदी समितीच्या एका सदस्यांच्या दुचाकीमध्ये गांजा लपवून ठेवण्यात आले आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले तेव्हा तात्काळ भिसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी त्या सदस्याच्या घराची झडती घेतली मात्र गांजा मिळाला नाही तेव्हा ऐका दारूविक्रेत्याच्या पत्नीने त्या सदस्याच्या दुचाकीत गांजा असल्याचे सांगितले तेव्हा गांजा आढळून आला. असे गावात दबक्या आवाजात बोलल्या जातं आहे.
. सदर दारुबंदी समिती चा सद्स निर्व्यसनी असून कुठलाच व्यसन करीत नाही एक प्रामाणिक नागरिक आहे त्याला अटक करण्यात आली तेव्हा दारुबंदी समिती तमुस समिती ग्रा प ची सर्व कमेटी गावातील नागरिक यांनी पोलीस स्टेशन गाठीत सदस्यांवर गुन्हे दाखल करू नये हे एक षड्यंत्र असल्याचे सांगितले तेव्हा पोलिसांनी गावातील सर्व अवैध दारूविक्रेत्यांना बोलावून जोरदार विचारपूस केली असता संपूर्ण प्रकार उघडीस आले एका दारूविक्रेत्यांनीच गांजा दुचाकीत लपवून ठेवल्याचे उघडीस आले हा सर्व प्रकार हिंदी चित्रपट मालिका वर आधारित कथानक असल्याचे दिसून आल्याने परिसरात खमंग चर्चासुरु असून गावागावात पानटपरी चौकात ऐकायला मिळत आहे सदर प्रकरणी भिसी पोलीस ठाण्यात प्रकरनाची चौकशी सुरू असून दोषींवर कुठली कारवाई करण्यात येथे याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!