वाघाच्या हल्ल्यात दोन गायी ठार

6

मोटेगाव जंगल परिसरातील घटना

नेरी : जंगला लगत चरायला गेलेल्या दोन गायीवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मोटेगाव जंगल परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. सदर गायी या जर्शी जातीच्या आहे मोटेगाव येथील पुरुषोत्तम सोनवाने यांच्या मालकीच्या त्या गाई असून अंदाजे दीड लाख रुपयाचे शेतकऱ्यांच्या नुकसान झाले.

.       प्राप्त माहितीनुसार मोटेगाव बस स्टँड जवळील जंगल परिसरात दोन जर्शी जातीच्या गाई चरत असताना अचानक दबा धरून बसलेल्या मोट्या पट्टेदार वाघाने गायींवर हमला चढवला यात दोन दुधाळू गायी जागेवरच ठार केल्या तर गोरा सुद्धा वाघाच्या हल्ल्यात जखमी झाला सदर घटनेने मोटेगाव परिसरात वाघाची दहशत पसरली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक पाटील, वनमजुर महादेव जांभळे, सुनील चौधरी,आनंद ननावरे यांनी घटनास्थळी दाखल झाले मृत गायीचे पंचनामा करून अहवाल वनविभागाला सादर केला आणि वाघाच्या कृतीवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले सदर नुकसान ग्रस्त पुरुषोत्तम सोनवाने या गायी मालकाला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे