बैल धुताना तलावात बुडून युवा शेतकर्‍याचा मृत्यू 

42
  • सोनेगाव (वन ) येथील घटना 

चिमूर

.                  शेतात जाताना चिखलाने बैल माखले . त्यामुळे किडे त्यांना त्रास देतील म्हणून शेत शिवारातील तलावात बैल धूत असताना अचानक तोल गेला . यात तरुण शेतकर्‍याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना (दि. २२ ) गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान सोनेगाव (वन) येथील शेतशिवारात घडली . रोशन पांडुरंग सोनवणे(२६) रा. सोनेगाव (वन) असे मृतक युवा शेतकर्‍याचे नाव आहे .

.                 प्राप्त माहितीनुसार चिमुर तालुक्यातील सोनेगाव (वन) येथील रोशन पांडुरंग सोनवणे हा युवा शेतकरी आपली बैल जोडी घेऊन गुरुवार ला सकाळी शेतात गेला . शेतात जात असताना पांदन रस्त्यावर असलेल्या चिखलाने बैल माखले . दिवसभर बैल चिखलाने भरून राहिले तर त्यांना डास, चिलट सारखे किडे त्रास देतील या हेतूने रोशनने शेत शिवारात असलेल्या तलावात बैल धुण्यासाठी घेऊन गेला . बैल धुताना त्याचा तोल गेला आणि रोशन तलावाच्या पाण्यात बुडाला . काही वेळानंतर शेतात असलेल्या गावातील शेतकर्‍यांना रोशन चे बैल दिसले मात्र रोशन दिसत नसल्याने शोधाशोध सुरू झाली व बैल धुताना रोशन तलावात तर पडला नाही असा संशय शेजारील शेतकर्‍यांच्या मनात आला आणि याबाबत गावात रोशन तलावात बुडाल्याची बातमी पसरताच गावकर्‍यांनी तलावाकडे धाव घेतली . या घटनेची माहिती मिळताच भाजप बूथ अध्यक्ष प्रमोद श्रीरामे यांनी प्रशासनाला माहिती ददिली व स्थानिक ग्रामस्थ व प्रशासनाच्या मदतीने रोशनचा मृतदेह शोधण्यासाठी शोधकार्य सुरू केले असताना दुपारी ४ वाजताच्या दरम्यान युवा शेतकरी रोशनचा मृतदेह सापडला . घटनेचा पंचनामा चिमूर पोलिसांनी केला असून शव उत्तरीय तपाणीसाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. युवा शेतकरी रोशन सोनवणे यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून सोनेगाव (वन) गावात शोककळा पसरली आहे .