मुल : आजाराला कंटाळून एका विवाहित युवकाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. मंगेश रामन्ना बेलगेवार (३३) रा वार्ड क्रमांक १५ मूल असे मृतकाचे नाव आहे.
. मंगेश बेलगेवार रविवारी दुपारी १२ वाजता बाहेर जातो म्हणून घरून निघाला. मात्र सायंकाळ झाली तरी घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी सायंकाळी इतरत्र शोधाशोध केली. मात्र कुठेही थांगपत्ता लागला नाही. सकाळी कर्मवीर कॉलेज च्या मागील परिसरात रेल्वे पटरीजवळील विहिरीत एका व्यक्तीला प्रेत तरंगत असल्याचे निदर्शनास आले. प्रेताला बाहेर काढले असता मंगेश बेलगेवार असल्याचे कळाले.
. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात मुल येथे पाठविण्यात आले. काही दिवसांपासून मंगेश कावीळ आजाराने त्रस्त होता. आजाराला कंटाळून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. त्याच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त केले जात आहे.