भद्रावती : तालुक्यातील पिरली, वाघेडा, सागरा, बिजोनी, शेगाव हा मार्ग पूर्णपणे खराब झाला आहे. रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली असून अल्पवधितच रोडवरचे डांबर गिट्टी उखल्यामुळे मोठे गड्डे पडले आहे. याच मार्गाने भद्रावती, पिरली, शेगाव लालपरी विद्यार्थ्यांना शाळेत रोज आणतात आणि सोडतात.
. मात्र या खराब रस्त्यामुळे कधी लालपरी बंद होईल आणि विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होईल ही चिंता विद्यार्थ्यांना पडली आहे.


