डीएड महाविद्यालयाच्या परिसरात भरला कोंबड बाजार

32

विसापूर ग्रा. प. सदस्यासह पाच जण पोलिसांच्या ताब्यात

चंद्रपूर : शहरातील डी. एड. प्रशिक्षण संस्थेच्या मागील खुल्या परिसरात सुरु असलेल्या कोंबड बाजारावर सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास शहर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत शहर पोलिसांनी दोन कोंबडे, धारधार शस्त्र असा तीन हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन विसापूर ग्रामपंचायत सदस्य सुरज उद्धव टोमटे याच्यासह सय्यद शालीम सय्यद शकील रा. अंचलेश्वर वाॅर्ड चंद्रपूर, भुषण तुळशीदास भुजाडे रा.बाबुपेठ, फारुख उर्फ बबलू शेख रा. बाबुपेठ, भास्कर निखाडे रा. बाबुपेठ यांना ताब्यात घेतले आहे.

.        चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात कोंबड बाजार भरला असल्याची माहिती चंद्रपूर शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर शहर पोलिसांनी डी. एड. कॉलेज परिसराच्या मागील भागात कोंबड बाजार भरविण्यात आला होता. कोंबड्याला धारदार काती लावून जुगार खेळला जात होता. याची माहिती चंद्रपूर शहर पोलिस निरीक्षक प्रभावती ऐकुरके यांना मिळाली. त्यांनी पोलिस पथकासह कोंबड बाजार सुरु असलेल्या ठिकाणी धाड टाकली. त्या वेळी कोंबड्याला धारदार शस्त्र लावून जुगार खेळला जात होता.

.        पोलिसांनी तेथील पाचही जुगाऱ्यांवर कायद्याने अन्वये गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले. ही कारवाई शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश भोंगाळे, निकोडे, दिलीप कुसराम, सचिन बोरकर, इरशाद खान, रुपेश आदींनी केली.