पंचायत समिती सिंदेवाहीच्या कर्मचाऱ्याचा घरात आढळला मृतदेह

36

लोणवाही येथे मित्राच्या खोलीत आढळला मृतदेह

सिंदेवाही :- पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या लोनवाही येथील एका घरात सिंदेवाही पंचायत समितीचे कर्मचारी सोनल वनकर यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

.       मृतक सोनल वनकर हे बाबुपेठ चंद्रपूर येथील रहिवासी असून ते अविवाहित आहेत. ते पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत शिक्षण विभागात ज्येष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. ते चंद्रपूर वरून सिंदेवाही येथे ये – जा करीत होते. त्यांचा एक मित्र नामदेव पाचभाई हे सुद्धा पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत कंत्राटी ग्राम सेवक म्हणून कार्यरत असून ते लोनवाही येथे चामटकर यांचेकडे भाड्याने राहत होते. गुरुवारी पाचभाई यांची आई मरण पावल्याने ते चंद्रपूर येथे निघाले. मात्र तेव्हा मृतक सोनल वणकर हे पाचभाई यांचे खोलीवर थांबण्यासाठी गेले. आईची मयत करून पाचभाई हे कर्तव्यावर रुजू होण्यासाठी सोमवारी सिंदेवाही येथे आले. आणि आपल्या खोलीवर गेले. मात्र खोली जवळ जाताच त्याने दुर्गंधी असल्याचा वास आला. त्यांनी दरवाजा खोलून पहिला असता सोनल वनकर हे मृत अवस्थेत दिसले. त्यामुळे पाचभाई हे घाबरून गेले. व त्यांनी लगेच पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना फोनवरून सदर घटना बाबत कळविले. व सिंदेवाही पोलिसांना सुद्धा कळविले.

.       सिंदेवाही पोलीस स्टेशनचे उप निरीक्षक सागर महले, विनोद बावणे, अंमलदार मंगेश म्हातेरे घटनास्थळी दाखल झाले. आणि प्रेत ताब्यात घेतले. सोनल वनकर यांना दारू पिण्याची सवय होती. आणि अती दारूचे सेवन केले असल्याने चार दिवसापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून अजून पर्यंत मृत्यूचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे.