वरोऱ्यातील बेपत्ता मिथिल मंचेरियल रेल्वे स्थानकावर सापडला

866
  • रात्री एक वाजता झाला होता बेपत्ता 
  •  बेपत्ता मिथिल रेल्वे पोलीसांच्या ताब्यात 
  •  मिथिल ला आणण्यासाठी वरोरा पोलीस रवाना 

वरोरा

.              . सोमवारी रात्री एक वाजता च्या दरम्यान घरातून अचानक बेपत्ता झालेला दहा वर्षाचा चिमुकला मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तेलंगाना राज्यातील मंचेरीयल रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांना सापडला. तो सध्या सेंट्रल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असून त्याला आणण्यासाठी वरोरा पोलीस व मिथिल चे नातेवाईक मंचेरियल ला रवाना झाले आहे. 

.        . वरोरा शहरालगत असलेल्या साकार नगर एकार्जुना येथे मिथिल सुहास मेश्राम हा दहा वर्षाचा चिमुरडा आपल्या वडिलांकडे राहत होता. सोमवारी रात्री १ वाजता तो अचानक घरातून बेपत्ता झाल्याचे वडिलांच्या लक्षात आले. वडिलांनी रात्रीच त्याचा इतरत्र शोध घेतला मात्र तो दिसून येत नसल्याने त्याचे अपहरण तर झाले नाही ना असा संशय व्यक्त करत मिथिलच्या वडिलांनी वरोरा पोलिसात मिथिल हरविल्याची तक्रार नोंद केली. तक्रार प्राप्त होतात वरोरा पोलीस ठाण्याला नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे यांनी दहा वर्षाच्या बेपत्ता झालेल्या मिथिल ची शोध मोहीम सुरू केली मिथिल बेपत्ता असल्याची माहिती वायरलेस द्वारा संपूर्ण पोलीस स्टेशन येथे मिथिलच्या फोटोसह वायरल करण्यात आली. अगदी काही तासातच वरोरा पोलिसांना मिथिल सुहास मेश्राम हा दहा वर्षाचा चिमूरडा तेलंगाना राज्यातील मंचेरियल जीआरसी रेल्वे स्थानकावर सेंट्रल रेल्वे पोलिसांना आढळला. रेल्वे पोलिसांनी तात्काळ बेपत्ता मिथिल मंचेरियल जीआरसी रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती वरोरा पोलिसांना दिली. वरोरा पोलिसांनी मिथिलच्या आई-वडिलांना माहिती देत मिथिलला घरी परत आणण्यासाठी वरोरा पोलीस मिथिलच्या नातेवाईकासह मंचेरियल ला रवाना झाले. मिथिलचा पत्ता लागल्याने व तो सुखरूप असल्याने मिथिलच्या आई-वडिलांनी सुटकेचा श्वास घेतला.