सावधान..! त्या मॅसेजने बसत आहे आर्थिक फटका

501
  • एस बी आय बँकेचा लोगोचा वापर
  •  परिसरात अनेकांचे व्हाट्सअप हॅक.

गडचांदूर :- मारोती चाफले

.       सायबर अटॅक हा मोठ-मोठा कंपन्यांना झालेला आपण नेहमीच ऐकतो परंतु तो आता गल्लीबोळ्यातही पसरू लागला आहे. परिसरात मागील काही दिवसापासून एसबीआय रिवार्ड पॉइंट या धर्तीवर मॅसेज देत अनेक नागरिकांचे फोन हॅक होताना दिसून येत आहे तर काहींना आर्थिक फटका देखील बसला आहे.

स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे त्यासोबतच सोशल मीडियाचा वापर देखील अधिक प्रमाणावर होऊ लागला आहे याचा चांगला आणि वाईट परिणाम देखील नागरिकांवर होत आहे. परिसरात काही नागरिकांच्या व्हाट्सअप व व्हाट्सअप ग्रुप वर एसबीआय रिवार्ड अंतर्गत 9980 रुपयाचा रिवार्ड आपल्याला भेटणार खाली दिलेल्या ॲप्स इंस्टॉल करा असा मॅसेज अनेकांच्या व्हाट्सअप वर जात आहे आणि ते ॲप्स इंस्टॉल केल्यानंतर व्हाट्सअप हॅक होताना दिसत आहे.

इन्स्टॉल झाल्यानंतर ते स्वतः व्हाट्सअप हॅण्डल करत असून वेगवेगळ्या ग्रुप वर हॅक झालेल्या व्यक्तीच्याच नावाने संदेश पाठविल्याचे दिसून येत आहे. तर यामुळे अनेकांना आर्थिक फटका देखील बसल्याचे माहिती होत आहे.

व्हाट्सअप हॅक झाल्यानंतर संपूर्ण डाटा त्यांच्याकडे जात असून ते विविध मार्गाने आपला डाटा चा वापर करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे एस बी आय लोगो चा वापर करीत असून कसलाही ओ टी पी वगरे हॅक झालेल्या व्यक्तीला येत नसल्याचे बोलले जात आहे.

 

(चुकून हे अप्स इंस्टॉल झाले तेव्हा व्हाट्सअप हॅक झाल्याचे दिसून आले माझ्याच मोबाईल नंबर नी विविध ग्रुप वर तोच संदेश पाठविण्यात आला व काही वेळाने नंतर माझ्या बँक खात्यातून 20800 आठशे काढण्यात आले. 

*हारून *सिद्दीकी नांदा फाटा)*


(व्हॉट्स ॲप हाक झाल्या नंतर दोन दिवस माझे सिम कार्ड बंद होते. ते सिम कार्ड मी सुरू केले आणि आपले खाते तपासून बघितले तर 95500 रुपये काढल्याचे लक्षात आले. पैसे गेल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.   

*ईश्वर मोहुर्ले आवाळपूर* 


तक्रार आलेली असून सायबर सेल अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. अशा अनेक तक्रारी येत आहे. विविध पद्धतीने येणाऱ्या मॅसेज ला किंवा लिंक ला छेळू नका असे आवाहन या माध्यमातून करीत आहे.

*शिवाजी कदम,

( ठाणेदार गडचांदूर)*