प्रेयसीच्या हत्येप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या प्रियकराने घेतला गळफास

77
  • वरोरा पोलीस स्टेशन मधील घटना 
  • पाच दिवसापूर्वी केली होती प्रेयसीची हत्या 

किशोर डुकरे,

वरोरा  

.           प्रेयसी ची हत्या प्रकरणी खुनाच्या गुन्ह्याखाली पोलीस कोठडीत असलेल्या एका 20 वर्षीय तरुण आरोपीने पोलीस ठाण्यातच आत्महत्या केल्याचा प्रकार वरोरा पोलीस स्टेशनमध्ये रविवारी सकाळीस उघडकीस आला . या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे . समाधान माळी (20) असे मृतक आरोपीचे नाव आहे .

.               पोलीस सुत्रांनुसार जळगाव जिल्हातील समाधान माळी या युवकाचे आनंदवन येथे आपल्या आई वडीलाकडे राहत असलेल्या आरती दिगंबर चंद्रवंशी (24) या विवाहित महिलेशी सेवाग्राम येथे प्रेम झाले . समाधान ला कुष्टरोग झाल्याने तो उपचारासाठी आनंदवन येथे दाखल झाला . आनंदवनात उपचार घेत असताना तो तिथे काम करू लागला . आरती आणि समाधान चे प्रेम दिवसेंदिवस वाढत गेले . प्रेमाचे रूपांतर लग्नात करण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली असताना तिचे मन भरकटले आणि ती दुसर्‍या युवकाच्या प्रेमात पडली . ही चाहूल लागताच प्रेमाने वेडा झालेल्या समाधानचे व आरती चे खटके उडू लागले . आरती लग्नाला नकार देत असल्याने तिला संपविण्याचा समाधानने निर्धार केला होता . त्यानुसार समाधानने मार्च महिन्यात फ्लिपकार्ड वरुन ऑनलाइन चाकू खरेदी केला . आरतीचे आई वडील सेवाग्राम येथे उपचारासाठी जात राहतात याचाच फायदा घेत . 26 जून ला आरतीचे आई वडील सेवाग्राम येथे गेले असता संधीचा फायदा घेत समाधान आरतीच्या घरी गेला . आरती सोबत गप्पा मारल्या नंतर त्याने आरती सोबत शारीरिक संबध केले . त्यानंतर आरती बाथरूम मध्ये गेली. तिच्या पाठोपाठ समाधान सुद्धा गेला आणि तिचे लक्ष नसताना आरतीच्या पाठीमागावून तिच्या गळ्यावर व मानेवर चाकूने सापासप वार केले यात तिचा जागीच मृत्यू झाला . आरतीच्या हत्येनंतर समाधान नागपुर येथील अशोकवन मध्ये गेला होता परत वरोरा कडे येत असताना खांबाळा येथे वरोरा पोलिसांनी त्याला अटक केली होती . .

 

प्रेयसी आरती८

 

आरोपी समाधान माळी याला न्यायालयाने 4 जून पर्यन्त 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती . या दरम्यान समाधान ला वरोरा पोलिसांनी पोलिसीहिसका दाखवीत त्याच्या कडून हत्येची सर्व माहिती काढून घेतली . 30 जुन ला सकाळ च्या सुमारास आरोपी समाधान ने कोठडी बाहेर असलेले जुते आत मध्ये ओढून त्याचे लेस काढले आणि कोठडी मधील बाथरूम च्या दरवाज्या ला लेस बांधून गळफास घेतला . उपविभागीय अधिकारी , तहसिलदार यांच्या देखरेखीत पंचनामा करण्यात आला असून त्याचे शव शवविच्छेदना करिता चंद्रपुर येथे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,यांनी पत्रकारांना दिली .

घटनास्थळी जिल्हा अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रपूर रीना जनबंधू, सहायक पोलिस अधीक्षक नायोमी साटम, न्यायाधीश , उपविभागीय अधिकारी ,तहसिलदार , उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी , सीआयडी व एलसीबी पथक यावेळी उपस्थित होते