भिसी ची नंदीनी धकाते चिमुर तालुक्यातून द्वितीय
भिसी : चिमूर तालुक्यातील भिसी येथील श्री साई सायन्स अँन्ड कॉमर्स कॉलेज ने पहील्याच वर्षी वर्ग 12 वी चा 100 टक्के निकाल देऊन किमयाच केली.
. श्री साई सायन्स अँन्ड कॉमर्स ज्यूनिअर कॉलेज भिसी ची विद्यार्थीनी नंदीनी संजय धकाते हिने सायन्स फॅकल्टी मध्ये चिमुर तालूक्यातून व्दितीय तसेच आंबेनेरी केंद्रातून प्रथम स्थान प्राप्त करीत 76.17 टक्के गुण प्राप्त केले. तसेच येथीलच अमित सुरेन्द्र नन्नावरे याने 74.67 टक्के गुण प्राप्त करून आंबेनेरी केंद्रातून व कॉलेज मधुन व्दितीय स्थान प्राप्त केला.
. यावेळी श्री साई सायन्स अँन्ड कॉमर्स ज्यूनिअर कॉलेज चे प्राचार्य तसेच संस्थेचे सचिव प्रा. गणेश गभणे, प्रा. शिवराम वंजारी, प्रा. प्रफुल जांभुळे, प्रा. प्रगती चामाटे, प्रा. प्रगती कुमले, प्रा. निमजे, रमेश खेरे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.


