दोघांची प्रकृती गंभीर
भद्रावती तालुक्यातील गुडगाव येथील घटना
चंद्रपुर : तालुक्यातील गुडगाव येथील बापलेकासह दोन जण दारू सोडण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेडगाव येथे एका महाराजाकडे गेले. महाराजाकडून औषध घेत तिथेच औषधीचा पहिला डोज घेतला. आणि घरी परत आल्यावर चारही जणांची प्रकृती बिघडली. दरम्यान दोन युवकांचा घरीच मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सहयोग सदाशिव जीवतोडे (१९), प्रतीक घनश्याम दडमल (२६) राहणार गुडगाव असे मृतकांची नावे आहेत, तर सदाशिव पुंजाराम जीवतोडे (४५) व सोमेश्वर उद्धव वाकडे (३५) यांची प्रकृती चिंताजनक आहे.
. सध्या अनेक युवा पिढी दारूच्या व्यसनाधीन झाले. अगदी कमी वयातच शाळकरी मुले दारूच्या आहारी गेल्याचे चित्र दिसून येत आहे. वडीलच दारू पेत असल्याने मुलही दारूचा घोट घेतानी दिसत आहे. असाच प्रकार भद्रावती तालुक्यातील गुडगाव येथील सदाशिव जिवतोडे हे दारूच्या आहारी गेले होते. वडीलच दारू पितात म्हणून मुलगाही हळूहळू दारूच्या आहारी गेला. यामुळे घरचे कंटाळले असताना अचानक सदाशिव ला माहिती मिळाली की वर्धा जिल्ह्यातील शेडगाव येथे शेळके महाराज दारू सोडण्याची औषध देतात म्हणून गावातील प्रतीक घनश्याम दडमल, सोमेश्वर उद्धव वाकडे यांचेसह सदाशिव पुंजाराम जीवतोडे व त्यांचा मुलगा सहयोग सदाशिव जीवतोडे हे दि.२१ मे रोजी सकाळी 9 वाजता महाराजांकडे गेले होते. तिथे महाराजांनी दारू सोडण्याची औषध दिली. त्यानंतर ते सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आपल्या गावी गुडगाव येथे परत आले. घरी आल्यानंतर अचानक त्या चौघांचीही प्रकृती बिघडली. त्यांना लगेच भद्रावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र यात सहयोग व प्रतीक या दोघांचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
. दरम्यान या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना होताच भेट देत दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे आणण्यात आले. त्यांच्या शवविच्छेदन अहवाला नंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे माहिती आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साठम यांनी भेट देऊन माहिती घेतली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


