युवा पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी
अवैद्य दारू विक्रीमुळे महिला त्रस्त
वरोरा : वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे. आणि पोलीस प्रशासन कारवाई करण्याऐवजी ‘हप्ता वसूल’ करण्यात मग्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वरोरा उपविभागात नव्यानेच रुजू झालेल्या व स्वच्छ प्रतिमा असलेल्या युवा महिला उपविभागीय पोलीस अधिकारी नयोनी साटम यांनी याप्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
. वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत वरोरा शहरा सोबतच ग्रामीण भागात जवळपास प्रत्येक गावात अवैध धंद्याना ऊत आला आहे. सट्टा, सुगंधित तंबाखू, दारू, गांजा यांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. तर वरोरा शहरातील अनेक लॉज मध्ये तर शहरा लगत असलेल्या ओसाड लेआऊट मध्ये काही युवक अल्पवयीन मुलींना घेऊन जात अश्लील चाळे करीत असल्याचे ही बोलल्या जात आहे. तर शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थी गांजा च्या आहारी गेले आहे. सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांचा त्रास होत आहे, मात्र संबंधित व्यावसायिक आणि पोलीस यांचे संगणमत असल्याने याबाबत तक्रार करायची कोठे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच अवैध व्यावसायिकांची दहशत असल्याने नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.
. नागरी येथे होत असलेल्या अवैध दारू विक्री मुळे कित्येकदा महिलांनी एल्गार पुकारात वरोरा पोलीस ठाण्यात निवेदने दिली. तर नंदोरी खदान मध्ये विकल्या जात असलेल्या देशी दारू मुळे अनेकांची कुटुंब उघडल्यावर आली. येथील महिलांनी पुढाकार घेत दारू विक्रेत्याला झाडाला बांधून झोडपून काढले पोलिसांना माहिती दिली मात्र कारवाई शून्य उलट अवैध दारू विक्रेते मुजोर होत महिलांनाच ताकीत देत असतात की आम्ही पोलिसांना हप्ता देतो जे होईल ते करा. या प्रकारामुळे वरोरा पोलिसांना प्रतिमा खालवली आहे. मात्र लेडी सिंघम म्हणून ओळख झालेल्या कर्तव्यदक्ष युवा महिला उपविभागीय पोलीस अधिकारी नयोनी साटम या हप्ता वसुली खोरांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हप्ता ठरलेला वरोरा तालुक्यात होत असलेल्या अवैध रेती तस्करी, कोळसा तस्करी, दारू तस्करी, सट्टा यांच्याकडून दर महिन्याला हप्ता ठरलेला असल्याची माहिती आहे. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांना वेगळा वेगळा हप्ता द्यावा लागत असल्याने तस्कर ही परेशान आहे मात्र धंदा करायचा म्हणजे द्यावेच लागते. असा दबक्या आवाजात बोलल्या जात आहे.
पोलिसाचा केली तक्रारकर्त्यांची चुप्पी वरोरा शहरातील एका दारू विक्रेत्याला वरोरा पोलीस स्टेशनंचा कर्मचाऱ्याने साहेबांसाठी तीन लाख रुपये व स्वतःसाठी ३० हजार रुपये महिन्याचा हप्ता मागत असल्याची माहिती एका हॉटेल मध्ये बोलावून पत्रकारांना दिली. याबाबत चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे तक्रार देणार असल्याची माहिती दिली मात्र ही माहिती पोलिसांना माहीत होताच त्या दारू विक्रेत्याला पुन्हा असं घडणार नाही म्हणून चुप्पी करण्यात आल्याची चर्चा आहे.


