विहीरगाव २ सागवानाची अवैध तोड प्रकरण
नेरी : पळसगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मदनापूर उपक्षेत्रातील नियतक्षेत्र विहीरगाव क्र २ मध्ये मिश्र रोपवणातील मौलवान सागवानाची सागतस्करा कडून खुलेआम तोड केली गेली आहे. सदर साग तोड मागील कित्येक दिवसांपासून सुरू असल्याचे अनेक सागाच्या खुंटावरून निदर्शनास येत असून सोन्याच्या किंमतीने विकल्या जाणाऱ्या सागवानाची अवैध तोड झाली आहे. त्यामुळे वनाधिकारी गप्प का असा प्रश्न निर्माण होत आहे?
. सविस्तर वृत्त ताडोबाच्या जंगल पायथ्याशी असलेल्या विहीरगाव २ मध्ये आज प्रत्यक्ष प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीनी वनरक्षका व वनमजुरा सोबत जाउन पाहणी केली असता कित्येक सागझाडेंचे खुटे त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. या बद्दल वनपरीक्षेत्र अधिकारी यांना माहिती विचारली असता त्यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना मला विचारून गेले का ? मला पत्र दिले का ? तुम्हाला कुणी अधिकार दिला ? अश्या एकरी शब्दात मी तुमच्यावर कारवाही करतो असे अशोभनीय चिडून जाऊन शब्द बोलून त्यांनी आपल्या खऱ्या वनधिकारीचा परिचय दिला.
. प्रत्यक्ष घटनास्थळी बघितले असता सर्व स्पष्ट दिसत असून असल्या वनाधिकारी आणि वनकर्मचारी यांच्या गलथाण करभरामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पूर्वी सुद्धा वनपरीक्षेत्र अधिकारी जीप्सी प्रकरणात गोवले गेले होते, अवैध वृक्ष तोडीवर कार्यवाही वनविभाग करेल का ?याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.
. सदर अवैध वृक्षतोड ही वनपरीक्षेत्राच्या माथ्यावर आली असून जीवंत असलेले व पूर्ण वाढ झालेली वृक्ष तोडली जात आहेत. तसेच मागील दोन वर्षांपूर्वी पासून तोड झाली असल्याने अनेक खुंट आढळून आले असल्याने एकच खळबळ उडाली आहे मात्र. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा या प्रकरणात वरिष्ठ वनाअधिकारी कोणावर कारवाही करतात कि अशीच साग कटाईत थातूर माथुर चौकशी करून या प्रकरणातील दोषींला अभय देतात काय ? या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित प्रकरणाची आज चौकशी करीता आम्ही चंद्रपूर वरून निघालो असून चौकशी करण्यात येईल.व दोषी असलेल्यावर रीतसर कार्यवाही करण्यात येईल. कुशाग्र पाठक, उपासंचालक, ताडोबा बफर चंद्रपूर


