गावात राहत नसलेल्या पोलीस पाटलाची पोलिसांत तक्रार
पोलिस प्रशासन पोलीस पाटलावर मेहेरबान : गावकऱ्यांचा आरोप
सिंदेवाही : पोलिस पाटील हे गावातील सर्वात महत्वाचे पद आहे. पोलिस पाटील हा प्रशासकीय यंत्रणेचा म्हणजेच पोलीस यंत्रणा व प्रजा यामधील महत्वाचा दुवा आहे. प्रत्येक गावात पोलीस पाटील यांची भूमिका गावात शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची असते. पोलिस पाटील हा प्रशासकीय अधिकाऱ्याकडून तंटामुक्तीचे काम करतो. असे असताना मात्र लाडबोरी येथील पोलिस पाटील रुपेश नागदेवते हे वर्षभर गावात न राहता शासनाकडून मिळणारे मानधन हडप करीत असून याबाबत गावकऱ्यांनी तक्रार केली असता पोलीस विभागाने थातुर मातुर अहवाल देऊन पोलीस पाटील यांची पाठराखण केली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
. सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लाडबोरी येथे पोलीस पाटील म्हणून रुपेश नागदेवते यांची काही वर्षांपूर्वी नियुक्ती झाली आहे. तेव्हापासून नागदेवते काही दिवस गावातच राहून काहीतरी कामधंदा करायचे. मात्र मागील काही वर्षापासून ते गावात राहत नसल्याने गावात अवैध्य धंद्यांना उत आला. अनेक तरुण आणि विद्यार्थी दारूच्या आहारी गेले. गावात खून, मारामारी, चोऱ्या, अशा घटना मध्ये वाढ होत चालली. परिणामी गावातील शांतता, सुव्यवस्था धोक्यात आली आहे. अशातच गावातील काही महिला एकत्र येत गावात अवैद्यपणे विकली जाणारी दारू बंद करून गावात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
. मात्र पोलीस पाटील रुपेश नागदेवते यांनी गावातील महिलांना दारूबंदीच्या कामात कोणतेही सहकार्य केले नाही. पोलिस पाटील रुपेश नागदेवते हे महिन्यातील १५ दिवस महावितरणचे मीटर रीडिंग व बिल वाटप चे काम करतात. तर उर्वरित १५ दिवस पत्नी गडचिरोली जिल्ह्यात कंत्राटी म्हणून काम करीत असल्याने पत्नीकडे राहत असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला असून शासनाकडून मिळणारे पोलीस पाटील यांचे मानधन विनाकाम करता उचल करीत असल्याने पोलीस पाटील रुपेश नागदेवते यांचेवर कारवाही करण्यात यावी. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
पोलिस पाटील हे तंटामुक्त समितीचे निमंत्रक म्हणून काम पाहतात. मात्र त्यांनी महिन्यातील एकही दिवस गावात राहत नसल्याने, आणि आपल्या वैयक्तिक कामामुळे पोलीस पाटील तंटामुक्त समितीच्या मीटिंग वेळेवर घेत नाही. अंबादास चौके, अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती लाडबोरी
पोलिस पाटील हे आपले वयक्तिक कामे करीत असतात. आणि शनिवार रविवार आपल्या पत्नीकडे जात असतात. गावातील नागरिकांचे कामे त्यांचेमुळे थांबले असल्याची तक्रार अजून पर्यंत माझ्याकडे आली नाही. ममता चाहांदे, सरपंच, ग्राम पंचायत लाडबोरी


